जामखेड : कर्जत-जामखेड बाजार समितीच्या सभापती निवडणुकीसाठी आता हाय होल्टेज ड्रामा बघायला मिळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. राष्ट्रवादी आण भाजपला या निवडणुकीत ९-९ जागा मिळाल्याने सभापती कुणाचा ? असा सवाल आता उपस्थिती केला जात आहे. यासाठी चिठ्ठी काढून की हात उंचावून मतदान केलं जाईल? असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे आता सगळ्याचं लक्ष लागून राहिलं आहे.
हेही वाचा…डीआरडीओ कुरूलकर प्रकरणात नवी माहिती, वायुदलाचा अधिकारीही हनी ट्रॅपमध्ये
बाजार समितीच्या सभापतीपदाची निवड प्रक्रिया पुर्ण होणार असून आज सर्व १८ संचालकांना १ वाजता बाजार समितीच्या कार्यालयात उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून आर.एफ.निकम, तर सहायक निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून एन.बी. मुंडे काम पाहणार आहेत. त्यामुळे सभापती कुणाचा होणार. याकडे लक्ष लागून राहिलं आहे.
हेही वाचा…“..तर त्यांना अजीबात सोडणार नाही, सगळं बाहेर काढू, “देवेंद्र फडणवीसांनी थेट इशाराच दिला
या निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आणि भाजपचे नेते राम शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. राष्ट्रवादी आणि भाजपला समान जागा मिळाल्यानंतर सभापती निवडीसाठी मोठा पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे सभापतीची माळ कुणाच्या गळ्यात पडणार? याची उत्सुकता लागून राहिली आहे. तर भाजपचे खासदार सुजय विखे पाटील यांनी सभापती भाजपचाच होईल असं सुतोवाच केलं होतं. त्यामुळे त्यांच्याकडेही लक्ष आहे.
हेही वाचा…“पुणे जिल्ह्याचं विभाजन करून त्याला ‘शिवनेरी’ नाव द्या,” महेश लांडगेंची फडणवीसांकडे मागणी
दरम्यान, सभापती निवडणुक प्रक्रियाच्या वेळी अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रशासनाकडून योग्य ती काळजी घेण्यात आली आहे. कर्जत जामखेडमध्ये सध्या पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे. यासाठी पोलीस निरिक्षक महेश पाटील लक्ष ठेऊन राहिले आहेत.
READ ALSO :
हेही वाचा…निवडणुकांचा बिगुल वाजला..! महापालिकांच्या निवडणुका ऑक्टोंबर-नोव्हेंबरमध्ये, फडणवीसांचे संकेत
हेही वाचा…‘कर्नाटक पॅटर्न’ काॅंग्रेस महाराष्ट्रातही राबवणार ? निवडणुकीसाठी डावपेच आखण्यास सुरूवात
हेही वाचा…भाजप नेत्यांना एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपद रूचेना..? मुळीक म्हणाले “आजही आमच्या मनात सल…”
हेही वाचा…१६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय कधी ? विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिलं उत्तर
हेही वाचा…१६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय कधी ? विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिलं उत्तर