पुणे : राज्यात गेल्या काही वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका विविध कारणांमुळे रखडल्या आहेत. याबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी देखील सुरू आहे. याबाबतची पुढची सुनावणी येत्या जुन जुलै महिन्यात होणार आहे. त्यामुळे ह्या निवडणुका लवकरच लागण्याची शक्यता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा…“..तर त्यांना अजीबात सोडणार नाही, सगळं बाहेर काढू, “देवेंद्र फडणवीसांनी थेट इशाराच दिला
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका प्रभाग रचना, वार्ड रचना, सदस्य संख्या इत्यादी कारणामुळे रखडल्या आहेत. महाविकास आघाडी सरकारने घेतलेले सर्व निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने रद्द केल्याने कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकांवर सध्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. त्याची पुढची सुनावणी येत्या महिन्यात होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुका कधी लागणार? याची शक्यता व्यक्त केली आहे.
हेही वाचा…“पुणे जिल्ह्याचं विभाजन करून त्याला ‘शिवनेरी’ नाव द्या,” महेश लांडगेंची फडणवीसांकडे मागणी
स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकाबाबत सर्वोच्च न्यायालयातील केस ही कोर्टात जुलै महिन्यात सुनावणीसाठी ठेवण्यात आली आहे. याचा निकाल ऑगस्टमध्ये लागला. तर या सर्व निवडणुका ऑक्टोंबर- नोव्हेंबर मध्ये लागू शकतात. अशी शक्यता देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. तर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील अशीच शक्यता व्यक्त केली आहे.
हेही वाचा…“मोदीने केलेल्या कामावर विश्वास असेल तर भाजपने बॅलेट पेपर वर निवडणुका लढव्याव्यात”
दरम्यान, हे वर्ष प्रामुख्याने निवडणुकांचं वर्ष आहे. सुप्रीम कोर्टाचा निकाल लागल्यानंतर रांगेत नगरपालिका, महानगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुका होतील. ह्या निवडणुका सुटतच नाही. अशा निवडणुका घोषीत होऊन मार्च मध्ये सहा टप्प्यात लोकसभा निवडणुका होतील. त्याआधी विधानसभा निवडणुका होतील. अस चंद्रकांत पाटलांनी म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…‘कर्नाटक पॅटर्न’ काॅंग्रेस महाराष्ट्रातही राबवणार ? निवडणुकीसाठी डावपेच आखण्यास सुरूवात
हेही वाचा…भाजप नेत्यांना एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपद रूचेना..? मुळीक म्हणाले “आजही आमच्या मनात सल…”
हेही वाचा…१६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय कधी ? विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिलं उत्तर
हेही वाचा…१६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय कधी ? विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिलं उत्तर
हेही वाचा…डीआरडीओ कुरूलकर प्रकरणात नवी माहिती, वायुदलाचा अधिकारीही हनी ट्रॅपमध्ये