पुणे : राज्यात लवकरच निवडणुकांचा हंगाम सुरू होणार असून तसे सुचकं संदेश राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल पुण्यातल्या कार्यक्रमात दिले आहेत. राज्यात महानगरपालिका, विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका लवकरच होतील. असं विधान फडणवीसांनी केलं आहे. यातच आता येत्या १८ तारखेला पुण्यात भाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक होणार आहे. या बैठकीत नेमकी काय चर्चा होणार ? त्याकडे सगळ्याचं लक्ष लागून राहिलं आहे.
हेही वाचा…निवडणुकांचा बिगुल वाजला..! महापालिकांच्या निवडणुका ऑक्टोंबर-नोव्हेंबरमध्ये, फडणवीसांचे संकेत
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात १८ मे रोजी भाजप राज्य कार्यकारिणीची बैठक होत आहे. या बैठकीत राज्यातील भाजपचे महत्वाचे नेते उपस्थित राहणार असून विविध विषयांवर चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर शहाराध्यक्षांचा देखील कार्यकाळ संपत आल्याने या बैठकीत पुण्याला नवा भाजपचा शहाराध्यक्ष मिळणार का ? याची चर्चा देखील राजकीय वर्तुळात रंगली आहे.
हेही वाचा…‘कर्नाटक पॅटर्न’ काॅंग्रेस महाराष्ट्रातही राबवणार ? निवडणुकीसाठी डावपेच आखण्यास सुरूवात
आगामी काळातील निवडणुका महाविकास आघाडी एकत्रित लढणार असून यासाठी देखील भाजप रणनीतीवर चर्चा करू शकते. त्याचबरोबर महानगरपालिका, विधानसभा, आणि लोकसभा निवडणुकांबाबत शिंदे गटाला किती जागा द्याव्यात. याचीही चर्चा होणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्याचबरोबर कर्नाटकात झालेल्या पराभावाचीही विश्लेषण या बैठकीत होण्याची शक्यता आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“आज जर महाराज असते, तर हत्तीच्या पायी दिले असते,” कुरूलकर प्रकरणांवरून आव्हाड संतापले
हेही वाचा…“सरकारमध्येच एकच शहाणा माणूस, तो म्हणजे देवेंद्र फडणवीस, बाकी सगळेअतीशहाणे किंवा मूर्ख”
हेही वाचा…“आघाडीने आगामी निवडणुकांसाठी कंबर कसली, जागावाटपासाठी समिती नेमणार” ?
हेही वाचा…कर्नाटकातला पराभव भाजपच्या जिव्हारी..! जे. पी. नड्डा पराभवाचा अहवाल मोदींना सादर करणार
हेही वाचा…जामखेड बाजार समितीचा सभापती कुणाचा ? रोहित पवार- राम शिंदेंची प्रतिष्ठा पणाला