नागपुर : काॅंग्रेसचे खासदार राहुल गांधी आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर टिका केल्यानंतर काॅंग्रेसमधून निलंबित केलेले आशिष देशमुख निवडणुक लढविण्यासाठी तयार झाले आहेत. काॅंग्रेसने निलंबित केलं असलं तरी काॅंग्रेसकडूनच निवडणुक लढविणार असल्याचं त्यांनी सांगितलं असून या मतदारसंघात ते काॅंग्रेसचे आमदार सुनील केदार यांच्याविरोधात दंड थोपडण्याच्या तयारीत दिसत आहेत.
हेही वाचा…“आज जर महाराज असते, तर हत्तीच्या पायी दिले असते,” कुरूलकर प्रकरणांवरून आव्हाड संतापले
नागपुरचे काॅंग्रेसचे एका नेत्याचं काॅंग्रेसने निलंबन केलं होतं. तसं माझं देखील निलंबन मागे घेतलं जाईल. त्यामुळे येत्या 2024 ची राज्यातील विधानसभा निवडणुक लढवण्यासाठी मी इच्छुक आहे. काॅंग्रेसने तिकीट दिलं नाही तरी मी भाजपमध्ये न जाता काॅंग्रेसकडूनच निवडणुक लढविणार. असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा…“सरकारमध्येच एकच शहाणा माणूस, तो म्हणजे देवेंद्र फडणवीस, बाकी सगळेअतीशहाणे किंवा मूर्ख”
यातच आशिष देशमुख ज्या मतदार संघातून येतात. त्या मतदार संघात सध्या काॅंग्रेसचे सुनील केदार म्हणून आमदार आहेत. काॅंग्रेसने त्यांचं निलंबन मागे न घेतल्यास ते या मतदार संघातून अपक्ष म्हणून निवडणुक लढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आशिष देशमुख सुनील केदार यांच्याविरोधात दंड थोपडण्याची आता शक्यता व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा…“आघाडीने आगामी निवडणुकांसाठी कंबर कसली, जागावाटपासाठी समिती नेमणार” ?
दरम्यान, राज्यात अलिकडेच झालेल्या शिक्षक आणि पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीच्या वेळी आशिष देशमुख चर्चेत आले होते. यावेळी नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात असा वादही चर्चेला आला होता. त्यावेळी आशिष देशमुख यांनी नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर देशमुख यांनी राहुल गांधी यांच्यावरही टिका केली. त्यानंतर काॅंग्रेसने आशिष देशमुख यांचं निलंबन केलं.
READ ALSO :
हेही वाचा…राम शिंदेंनी रोहित पवारांना दिलं धोबीपछाड, चुरशीच्या लढाईत भाजपचा विजय, ईश्वरी चिठ्ठीतून भाजपची बाजी
हेही वाचा…बुलढाणा बाजार समितीवर ठाकरे गटाचं गुलाल, आमदार संजय गायकवाडांना मोठा धक्का
हेही वाचा…शिवसेनेच्या घटनेवरून निकाल देणार? शिवसेना कुणाची? राहुल नार्वेकर स्पष्टच बोलले
हेही वाचा…बेताल वक्तव्य, विधानसभा अध्यक्षांना चॅंलेज, संजय राऊतांवर पुन्हा एकदा हक्कभंग दाखल
हेही वाचा…भाजप इलेक्शन मोडवर..! आगामी निवडणुकांबाबत पुण्यात भाजपची रणनीती ठरणार?