मुंबई : कर्नाटकच्या अभुतपुर्व यशानंतर आता राज्यातही महाविकास आघाडीला बळ प्राप्त झालं आहे. याचाच एक भाग म्हणून आगामी लोकसभा निवडणुका महाविकास आघाडी एकत्रित लढणार असल्याची माहिती आघाडीने दिली आहे. या निवडणुकांच्या जागावाटपासाठी सहा सदस्यांची समिती नेमणार आहे. या समितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून कुणाची वर्णी लागणार याकडे सगळ्याचं लक्ष लागलं आहे.
हेही वाचा…सावनेर मतदार संघात काॅंग्रेसचे दोन नेते आमनेसामने, देशमुख केदारांच्या विरोधात दंड थोपडणार?
लोकसभा निवडणुकीच्या समन्वय समितीसाठी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी, काॅंग्रेस आणि शिऊबा यातील प्रत्येकी २ अशा सहा सदस्यांचा समावेश असणार आहे. या समितीसाठी शिऊबा गटाकडून खासदार संजय राऊतांचं नाव निश्चित झालं असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. तर दुसरा नेता कोण ? याची चर्चा सध्या शिवसेनेच्या गोटात सुरू आहे.
हेही वाचा…राम शिंदेंनी रोहित पवारांना दिलं धोबीपछाड, चुरशीच्या लढाईत भाजपचा विजय, ईश्वरी चिठ्ठीतून भाजपची बाजी
शिवसेनेकडून संजय राऊत यांच्यासोबत अरविंद सावंत, अनिल देसाई आणि सुभाष देसाई यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. ही समिती लवकरच लवकर स्थापन होणार असून शिवसेनेकडून कुणाला या समितीत स्थान मिळणार ? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे. राज्यातील ४८ लोकसभा मतदार संघापैकी तिन्ही पक्षाला जागा वाटप करण्यात याव्यात. यासाठी ही समिती नेमण्यात येणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…कर्नाटकतला पेच मिटला..! ‘सिद्धरामय्या’ मुख्यमंत्री तर ‘डी. के. शिवकुमार’ हे उपमुख्यमंत्री ?
हेही वाचा…मोठी बातमी..! देवेंद्र फडणवीसांची तब्येत बिघडली, नियोजित सर्व कार्यक्रम रद्द, सक्तीच्या विश्रांतीवर
हेही वाचा…संसदेतील जबाबदार लोकप्रतिनिधींची पिंपरी-चिंचवडला बेजबाबदार वागणूक?
हेही वाचा…“शरद पवारांनी राज्यात आघाडी निर्माण केल्याने राष्ट्रवादी पक्ष विरोधकांच्या टार्गेटवर”, जयंत पाटील
हेही वाचा…“राणेंनी राज ठाकरेंची इज्जतच काढली…! १ आमदार असलेल्या पक्षांनी ३०२ खासदार असलेल्या पक्षांबद्दल बोलू नये”