नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काॅंग्रेसने मोठा विजय मिळवला. परंतु कर्नाटकचा पुढचा मुख्यमंत्री कोण? असा पेच मागील दोन ते तीन दिवसापासून कायम आहे. सलग चार दिवस विचारमंधन करून काॅंग्रेस हायकमांडमध्ये कर्नाटकचा फार्मुला तयार करण्यात आल्याची माहिती आता समोर येत आहे. त्यामुळे मागील काही दिवसापासून सुरू असलेल्या राजकीय घडामोडीला आता पुर्णविराम लागण्याची शक्यता आहे.
हेही वाचा…कर्नाटकतला पेच मिटला..! ‘सिद्धरामय्या’ मुख्यमंत्री तर ‘डी. के. शिवकुमार’ हे उपमुख्यमंत्री ?
कर्नाटकबाबत ४८ तासांपासून सुरू असलेली चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. सिद्धरामय्या हे मुख्यमंत्री तर डी. के. शिवकुमार हे उपमुख्यमंत्री होतील. असा फॉर्म्युला काॅंग्रेसने तयार केला आहे. त्यावर आता शिक्कामोर्तेब झाला असून सिद्धरामय्या उद्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे. बंगळुरू मध्ये शपथविधी कार्यक्रमाची तयारीही सुरू करण्यात आली आहे.
हेही वाचा…मोठी बातमी..! देवेंद्र फडणवीसांची तब्येत बिघडली, नियोजित सर्व कार्यक्रम रद्द, सक्तीच्या विश्रांतीवर
सिद्धरामय्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याआधी काॅंग्रेसच्या नेत्यांची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत काॅंग्रेसची पुढची रणनीती ठरणार असून उद्या कॅबिनेट मंत्री देखील शपथ घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. यातच काॅंग्रेसने जो फॉर्म्युला तयार केला आहे. त्यानुसार, डी.के. शिवकुमार हे प्रदेशाध्यक्षही राहतील तसेच शिवकुमार यांना त्यांच्या पसंतीचे मंत्रालयही देण्यात येईल. अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.
हेही वाचा…संसदेतील जबाबदार लोकप्रतिनिधींची पिंपरी-चिंचवडला बेजबाबदार वागणूक?
दरम्यान, गेल्या पाच दिवसांपासून बैठकांवर बैठका काॅंग्रेसच्या नेत्यांच्या सुरू होत्या. डी. के. शिवकुमार आणि सिद्धरामय्या ह्या दोन्ही नेत्यांनी काल खासदार राहुल गांधी यांची भेट घेतली होती. त्यानंतर काॅंग्रेसच्या हायकमांडने सिद्धरामय्या यांच्या नावावर शिक्कोमोर्तेब केला.
READ ALSO :
हेही वाचा…“महाडच्या जागेवरील काॅंग्रेस अन् सेनेमधील संबंध ताणले, स्नेहल जगतापांची मोठी कोंडी” ?
हेही वाचा…“न शिकलेल्या माणसाला समजू शकतं, मग ‘नार्वेकर’ तर सुप्रिद्ध घराण्यातले वकील”, आव्हाडांचा हल्लाबोल
हेही वाचा…भाजपच्या ४ आमदारांकडून मंत्रीपदासाठी पावणे दोन कोटींची मागणी, जे.पी.नड्डा यांचे स्वीय सहायक म्हणून…
हेही वाचा…“राज्यात ‘सत्ता-संघर्ष’ झाला नाही, तर तो एकनाथ शिंदेंच्या मदतीने घडवून आणलेला तो ‘सट्टा’’”
हेही वाचा…आघाडीच्या ‘त्या’ समितीत सेनेकडून संजय राऊतांचं नाव निश्चित, तर दुसरा नेता कोण ?