जामखेड : कर्जत-जामखेड बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी आणि भाजपला समान जागा मिळाल्यानंतर इश्विरी चिठ्ठीत भाजपने बाजी मारली. या निवडणुकीत भाजपचे नेते राम शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. परंतु या निवडणुकत राम शिंदे पवारांवर वरचढ ठरले. मात्र या निवडणुकीत विखेंनी रोहित पवारांना छुपा पाठिंबा दिल्याचा आरोप राम शिंदे यांनी विखेंवर लावला. त्यावर आता विखेंकडून प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा…“राज्यात ‘सत्ता-संघर्ष’ झाला नाही, तर तो एकनाथ शिंदेंच्या मदतीने घडवून आणलेला तो ‘सट्टा’’”
जामखेड बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी आणि भाजपला प्रत्येकी ९ जागा मिळाल्या. त्यानंतर इश्विरी चिठ्ठी काढून भाजपचे उमेदवार शरद कारले सभापती तर उपसभापती म्हणून कैलास बराट यांची निवड करण्यात आली. याची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली होती. मात्र या निवडणुकीवरून भाजपचेचे नेते आमनेसामने आलेत.
हेही वाचा…आघाडीच्या ‘त्या’ समितीत सेनेकडून संजय राऊतांचं नाव निश्चित, तर दुसरा नेता कोण ?
राम शिंदे यांची जी काही नाराजी आहे, ती भाजपच्या वरिष्ठांकडे मांडली जाईल. अन् यावर तेच निर्णय घेतील. निवडणुका आहेत. म्हणजे काही चुका होणारच आहेत. परंतु राज्यात गेल्या ३० वर्षापासून आमच्या परिवाराचा पवार परिवारांच्या विरोधात संघर्ष सुरू आहे. त्यामुळे या निवडणुकीत विखे पाटलांनी पाठिंबा दिला. यावर नगर जिल्ह्यात कुणीही विश्वास ठेवायला तयार नसणार. त्यामुळे याबाबत देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करू. असं खासदार सुजय विखे पाटलांनी सांगितलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“कोर्टाने शिंदे गटाला बेकायदेशीर ठरवलंय, हे लोकांना पटवून सांगा”, उद्धव ठाकरेंचं पदाधिकाऱ्यांना आदेश
हेही वाचा…बैठकांवर बैठका झाल्या, अन् पेच मिटला, कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उद्या शपथविधी
हेही वाचा…“महाडच्या जागेवरील काॅंग्रेस अन् सेनेमधील संबंध ताणले, स्नेहल जगतापांची मोठी कोंडी” ?
हेही वाचा…“न शिकलेल्या माणसाला समजू शकतं, मग ‘नार्वेकर’ तर सुप्रिद्ध घराण्यातले वकील”, आव्हाडांचा हल्लाबोल
हेही वाचा…भाजपच्या ४ आमदारांकडून मंत्रीपदासाठी पावणे दोन कोटींची मागणी, जे.पी.नड्डा यांचे स्वीय सहायक म्हणून…