सोलापूर : आगामी काही काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आता काही नेते इत पक्षात प्रवेश करताना दिसत आहे. अशातच आता सोलापुरात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांनी एमआयएमला मोठ खिंडार पाडले आहे. एमआयएमचे माजी शहर अध्यक्ष तौफिक शेख यांच्यासह सोलापुरचे माजी नगरसेवक राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे आता राष्ट्रवादीचा पारडं सोलापुरात जड होताना दिसणार आहे.
“उद्धव ठाकरेंनी 2019 ला पाठीत खंजीर खुपसलं, त्यांच्याच कर्माची ही फळ”
सोलापुर महापालिका 2017 च्या निवडणुकीत एमआयएमचे जवळपास 8 नगरसेवक निवडून आले होते. मात्र अंतर्गत राजकीय वादामुळे तौफिक शेख यांनी राष्ट्रवादीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर तस्लिम शेख, वहिदा शेख, पुनम बनसोडे. नुतन गायकवाड, शजिया शेख, रियाज खरादी हे देखील नगरसेवक राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थित त्यांचा पक्षप्रवेश केला जाणार आहे.
“पंकजा मुंडेंवर सतत अन्याय होतोय, त्यांनी वरिष्ठांना भेटावे”; खडसेंचा पंकजा मुंडेंना सल्ला
एमआयएमचे सोलापुर शहर आणि जिल्हा प्रमुख फारूक शाब्दी गेल्या दोन महिन्यांपासून सोलापुरातून गायब आहेत. मुस्लिम समाजाचा कैवार घेऊन आलेले एमआयएम नेते आणि नगरसेवक राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये प्रवेश करत असल्याची चर्चा रंगली. सोलापुरात 2014 च्या विधानसभा निवडणुकीत एमआयएम पक्ष मोठ्या ताकदीने उभा होता. त्यानंतर फ्रेब्रुवारी 2017 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत 9 नगरसेवकांनी विजय मिळवला होता.
“तर या बिनखात्याच्या मंत्र्यांचा महाराष्ट्राला काय उपयोग?” काॅंग्रेसचा तिखट सवाल
दरम्यान, तौफिक शेख समर्थक आणि फारूक शाब्दी समर्थक या दोन गटांत शहराध्यश्र पदावरून शाब्दिक चकमक झाली होती. त्यांमुळेच तौफिक शेख यांनी राष्ट्रवादीत जाण्याच निर्णय घेतला आहे.
Read also
- “चला आता काँग्रेसला सुध्दा उध्दव ठाकरेंचे मूळ गुण कळू लागले”; मनसेचा खोचक टोला
- “एक एक आमदार की किमत तुम क्या जानो सुबोध बाबू ;” अन् त्यावर पंकजा मुंडेंचा खुलासा
- “75 वर्षात पहिल्यांदाच आपल्या देशाला स्वच्छ विचारांचे पंतप्रधान लाभले”; नवनीत राणा
- “इगो उद्धव ठाकरेंना नाहीतर देवेंद्र फडणवीसांना आहे”
- “पत्नी, मुलगा नाही तर ड्रायव्हर किंवा चमच्यासाठीही आता नेते उमेदवारी मागतात”; गडकरींनी टोचले राजकारण्यांचे कान