पुणे : पुणे महापालिका स्थायी समितीचे माजी अध्यक्ष सदानंद शेट्टी आणि श्रीकांत शिरोळे या दोन बड्यानेत्यासह वानवडी परिसरातील सामाजिक कार्यकर्ते प्रफुल्ल जांभुळकर व केविन मॅन्युअल यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश झाला. त्यांच्या प्रवेशाने शहरात पक्षाला बळ मिळाले असल्याने येत्या काळात संपूर्ण शहर राष्ट्रवादीमय करण्याचा विश्वास पक्षश्रेष्ठींकडून करण्यात येत आहे. शिवाय त्याचे परिणाम आगामी पुणे महापालिका निवडूकीत पहायला मिळाणार आहेत. दरम्यान, पावसाळी अधिवेशनात भाजपच्या १२ आमदारांना घरी बसवले असताना २०२२ च्या महापालिका निवडणूकीत घड्याळ पुण्यातील सत्ताधारी भाजपचे १२ वाजवणार का?, हे पहाणे महत्वाचे ठरणार आहे.
काँग्रेसच्या आग्रहाखातर राष्ट्रवादीची विदर्भात दुय्यम भूमिका, मात्र आता हे खपवून घेणार नाही
गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी सदानंद शेट्टी यांनी काँग्रेस मधून भाजप मध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे कॅन्टोन्मेंट बोर्डात काँग्रेसशी हातातोंडात आलेला विजय भाजपने हिसकावला होता. काँग्रेसचे उमेदवार रमेश बागवे कमी मतांनी पराभूत झाले होते. शेट्टी हे गेली तीस वर्षे समाजकारण ,राजकारण करीत असल्याने कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार क्षेत्रात प्राबल्य आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्यात दिल्लीत खलबतं; राजकीय भूकंप होण्याची शक्यता?
राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष समाजाच्या, राज्याच्या विकासाला महत्त्व देणारा पक्ष आहे. म्हणूनच या पक्षाने राज्यात एक स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. येणाऱ्या काळासाठी पक्ष वाढीसाठी जोमाने काम करणार आहे. व पुढील वर्षी होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत पक्षाची सत्ता कशा प्रकारे आणता येईल यासाठी श्रीकांत शिरोळे आणि सदानंद शेट्टीच्या पक्षप्रवेशाने मोर्चे बांधणीला सुरूवात झाली आहे.
अनिल शिरोळे कोण होते?
भाजपात दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा एक आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा एक गट मानला जायचा. अनिल शिरोळे हे मुंडे गटाचे होते. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत पुण्याचा उमेदवार कोण हा सस्पेन्स शेवटपर्यंत कायम होता. अखेर गोपीनाथ मुंडेंनी अनिल शिरोळेंचं नाव उमेदवार म्हणून जाहीर केलं. याला गडकरी गटाचे असलेल्या गिरीश बापटांचा विरोध असल्याचंही दिसून आलं होतं. पण भाजपने एकजुटीने ही जागा लढली आणि मोठ्या फरकाने विजयही मिळवला.
गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर भाजपात एकाकी पडलेले अनिल शिरोळे यांची मतदारसंघातील पकडही कमी झाली. पुणे महापालिका निवडणुकीत त्यांना स्वतःला सिद्ध करता आलं नाही आणि तिथूनच शिरोळेंचा पत्ता कट होण्याची सुरुवात मानली जाते. विशेष म्हणजे पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट आणि खासदार अनिल शिरोळे यांच्यातही फार सौख्य नाही. त्यामुळे ही दरी वाढतच गेली.
सिध्दार्थ शिरोळेंची फुकटात वर्णी
वडील अनिल शिरोळे मंडे गटाचे समर्थक होते. त्यामुळे त्यांचा एकेकाळी मोठा दबदबा होता. वडील खासदार असल्याने मुलगा सिद्धार्थ शिरोळेंना पुण्यातील शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघामधून तिकीट मिळाले. निवडणूकीच्या रिंगणात उतरल्याने सिद्धांर्थ शिरोळेंची आमदारपदी वर्णी लागली. परंतू, वडीलांच्या दबदब्यामुळे मुलाची फुकटात वर्णी लागली अशीच चर्चा निवडणूकीनंतर पहायला मिळाली.
भापजला सहकारातील पेलत नसलेलं धनुष्य… अन् राष्ट्वादीची सहकारातील उल्लेखनीय कामगिरी
आमदार म्हणून मिरवताना सिद्धांर्थ शिरोळेंना म्हणाने तसे काम करात आले नाही. लोकांमध्ये न मिसळल्याने लोकांचीही त्यांच्यावर नाराजी दिसून येते. लोकांची कामं न झाल्यामुळे मतदारसंघातील जनताच नाराज झाल्यामुळे शिरोळेंच्या अडचणी आणखी वाढल्या. पुण्यासाठी छातीठोकपणे सांगता येईल असा कोणताही निर्णय त्यांच्या काळात झाला नाही.
शिवाजीनगर विधानसभेत शिरोळे विरुद्ध शिरोळे लढत रंगणार?
शिवाजीनगर भागात स्वतःच एक वेगळं स्थान असणार व्यक्तिमत्व म्हणजे श्रीकांत शिरोळे आदराने भांबुर्डा – गावठाण सोबतच शहरातील अनेक मान्यवर त्यांना ‘भाऊ’ म्हणतात. जनता पक्षातून राजकारणात उतरलेले भाऊ नंतर गाडगीळ यांचा हात धरून काँग्रेसवासी झाले. महानगरपालिकेतील अभ्यासू नगरसेवक म्हणून नाव लौकिक मिळालेले शिरोळे यांनी स्थायी समिती अध्यक्ष पदावर असताना केलेली काम आज देखील चर्चेचा विषय आहेत. शिवाजीनगर भागासह संपूर्ण पुणे शहरामध्ये त्यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे. श्रीकांत शिरोळे यांचे पुत्र रणजित शिरोळे राजकारणात सक्रिय असून सध्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत. त्यांनी पुण्यात लोकसभा निवडणूक देखील लढविली होती.
पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट आणि खासदार अनिल शिरोळे यांच्यातही फार सौख्य नाही. त्यातच एकाकी पडलेले सिद्धार्थ शिरोळे यांची मतदारसंघातील पकडही कमी झाली. त्यातच २०२२ च्या महापालिका निवडणुकीच्या तोंडावर श्रीकांत शिरोळे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादीने २०२४ ची मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यातच श्रीकांत शिरोळे आणि सदानंत शेट्टी यांच्या प्रवेशाने राष्ट्रवादीची पकड मजबूत होणार आहे. २०२४ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीने श्रीकांत शिरोळेंना पुण्यातील आमदारकीचे तिकीट दिल्यास पुन्हा एकदा श्रीकांत शिरोळे आणि सिद्धार्थ शिरोळे यांच्यात लढत होण्याची शक्यता होणार आहे. तसे झाल्यास कोणाचे पारडे जड ठरणार हे पहाणे महत्वाचे ठरणार आहे.
Read Also :
- ‘मिस्टर इंडिया’ झालेल्या झोटिंग समितीच्या अहवालावर, अजित पवारांचा मोठा खुलासा
- नाना पटोलेंच्या बोलण्याने आम्हाला काही फरक पडत नाही; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचे रोखठोक विधान
- दस मे बस! “पुणेकर” म्हणतात आता बस्स!
- मोठी उलथापालथ: नाशिक महापालिकेत पुन्हा एकदा मनसे राज येणार? ठाकरेंच्या भुमिकेकडे लक्ष…
- मेट्रोविरोधात आंदोलन, भाजप नेते अतुल भातखळकर पोलिसांच्या ताब्यात