पुणे : काही दिवसांपूर्वी राज्याच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुणे दौऱ्यावर असताना, १० रुपयांमध्ये एसी बसचा प्रवास करता येणाऱ्या उपक्रमाचे उद्घाटन केले. यावेळी त्यांच्यासोबत पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, इतर पदाधिकारी आणि भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते. त्यानंतर चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः बस मधून प्रवास केला.
मोठी उलथापालथ: नाशिक महापालिकेत पुन्हा एकदा मनसे राज येणार? ठाकरेंच्या भुमिकेकडे लक्ष…
यावेळी त्यांनी, पुण्यात एकाच तिकिटावर मेट्रो आणि बसने प्रवास करता येणार, त्यामुळे वेळ आणि पैश्याची बचत होणार असून, नागरिकांना आरामात ए सी बसमधून दोन्ही सुविधांचा प्रवास करता येणार आहे. स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांच्या कल्पनेतुन ही योजना सुरू झाली आहे. पुणे महापालिकेने पुण्य नगरीला प्रदूषण मुक्त करण्यासाठी पुढाकार घेतला आहे,” असं सांगितलं.
मेट्रोविरोधात आंदोलन, भाजप नेते अतुल भातखळकर पोलिसांच्या ताब्यात
मात्र, मोठा गाजावाजा करून सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमावर आता प्रश्नचिन्ह उठले असून, राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी, “या बसेस एसी बस नसून, भाजपाकडून पुणेकरांची शुद्ध फसवणूक करण्यात येत आहे,” अशा प्रकारची पोस्ट फेसबुक वर शेअर केली आहे. प्रत्युत्तरादाखल भाजपाने, “महामारी स्थितीत एसी लावला जात नाहीये, असे पीएमपी प्रशासनाने स्पष्ट केले आहे. संसर्ग कमी झाल्यानंतर प्रवाशांना ‘एसी’ बस मधून प्रवास करणे शक्य होणार आहे,” अशा आशयाची पोस्ट शेअर केली आहे.
किरीट सोमैय्यांचे महाविकास आघाडीवर गंभीर आरोप, महत्वाचे मंत्री अडचणीत येण्याची शक्यता
या पार्श्वभूमीवर, सध्याचा काळ पाहता ‘एसी’ बस सेवा म्हणून या सेवेचा उपभोग घेता येणार नसेल, तर हा अनावश्यक खर्च महापालिकेने का उचलला? महामारी संपल्यावरही या सेवेचे उद्घाटन करता आले असते, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रसनेंच्या सुपीक डोक्यात हा विचार डोकावला नाही का?, विरोधी पक्षनेत्यांना बोलावून ही सेवा सुरु करण्याची घाई आणि दिखावा करण्याचा अनावश्यक आटापिटा भाजपकडून का करण्यात आला? असा प्रश्न नागरिकांकडून विचारण्यात येत आहे.
Read Also :
- राज ठाकरे आणि चंद्रकांतदादा एकमेकांना भेटण्याची शक्यता; मनसे आणि भाजपा एकत्र येण्याच्या चर्चेला उधाण
- राज ठाकरे आणि चंद्रकांतदादा एकमेकांना भेटण्याची शक्यता; मनसे आणि भाजपा एकत्र येण्याच्या चर्चेला उधाण
- पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी संजय राठोड यांना क्लीन चिट? गृहमंत्र्यांचे महत्वपूर्ण विधान
- स्वबळावर लढण्याबाबतीत काँग्रेसमध्ये दोन गट? वडेट्टीवारांनी स्पष्ट केली आपली भूमिका
- फडणवीस-पंकजा मुंडे यांच्या राजकीय संबंधांवर, रामदास आठवलेंचा धक्कादायक खुलासा!