पुणे : गेल्या दोन दिवसापासून राज्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. याचा मोठा शेतकऱ्यांना बसला आहे. तर अनेक ठिकाणी पावसामुळे जिवीत्तहानी तसेच वित्तहानी देखील मोठ्या प्रमाणात झाली आहे. यातच शहरांमध्ये देखील जोरदार पाऊस पडल्याने ठिकठिकणी पाणी साचलं आहे. यातच एक पुण्यातील भाजपचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयात समोर पाणी जात असल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावरून काॅंग्रेसने त्यावर खोचक टोला लगावला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाडले, राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि शेकापला खिंडार!
काल झालेल्या पावसामुळे पुण्यातील विविध भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं. यातच विमाननगर परिसरात रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतुक को़ंडी देखील बघायला मिळाली. त्याचबरोबर पुण्यातील कर्वेनगर रोडवर असलेल्या भागात देखील पाणी साचलं. त्याच रस्त्यावर मुरलिधर मोहोळ यांच्या कार्यालयासमोर पाणी वाहताना व्हिडीओ मध्ये दिसत आहे. त्यावरून काॅंग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी भाजपला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.
“उद्धव ठाकरेच समाजाला आणि लोकांना चांगली दिशा दाखवू शकतात”
सचिन सावंत यांनी यांसर्दभात एक व्हिडीओ ट्विट केला आहे. त्याला असं कॅप्शन दिलं आहे की, येरे येेरे पावसा, पुणे पालिकेचा खाल्ला पैसा, पैसा मिळाला मोठा, भाजप ठरला खोटा, ये गं ये गं सरी, भाजपा खिसे भरी, सर आली धावून, भाजप ऑफिस गेले वाहून, असं म्हणत त्यांनी भाजपला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.
“दिलेला शब्द पाळतो अन् एकदा शब्द दिला तर मी स्वत: पण ऐकत नाही”; एकनाथ शिंदे
दरम्यान, आगामी महापालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर पुण्यात भाजपला सत्ता राखण्यास विरोधी पक्षांकडून अवघड जाणार आहे. कारण गेल्या अनेक दिवसापासून विरोधक विविध मुद्द्यांवरून भाजपला घेरण्याचा प्रयत्न करीत आहे.
Read also
- “उद्धव ठाकरेंनी हा अस्वल कुठून निवडला होता माहित नाही?”; भास्कर जाधवांची बांगरांवर टिका
- “दादा वॉशरूमला गेले होते रे, आता पुढच्या नाराजी पर्यंत तरी चर्चा बंद करा”
- “हिमंत असेल तर मोदी साहेबांचा फोटो न लावता निवडून येऊन दाखवा”; अजित पवार
- सोमय्यांचा घाव अनिल परबांवर बसला..! रिसोर्ट तुटणार, परब अडकणार..?
- तो 12 हजार कोटींचा ‘दंड पेंग्विन’ सेनाप्रमुखांकडून वसूल करायचा का ?” भाजपचा सवाल