मुंबई : शिवसेनेचे माजी मंत्री अनिल परब यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. अनिल परब यांचा संबंध असल्याचा आरोप असलेले साई रिसॉर्ट तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रशासकीय पातळीवर तयारी सुरू झाली आहे. रिसॉर्ट तोडण्यासाठी चिपळूनच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जाहीर निविदा मागवण्यात आल्या आहेत. त्यामुळे अनिल परब यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
“मुस्लिम समाजाने आपली डोके शाबुत ठेऊन उद्धव ठाकरेंच्या मागे उभे राहा”; भास्करराव जाधव
दापोली कोर्टाने दापोली पोलीस निरीक्षकांनी याप्रकरणी चौकशी करून पुढील 30 दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. ही माहिती केंद्रीय पर्यावरण खात्याचे वकील अॅड. प्रसाद कुवेसकर यांनी दिली. यामुळे अनिल परब यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. या दोन्ही रिसॉर्ट प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करावा व सरकारची फसवणुक केल्याप्रकरणी कारवाई व्हावी यासाठी दापोली कोर्टात काल 12 सप्टेंबर रोजी सुनावणी झाली.
“मुख्यमंत्र्यांनी ‘लम्पी’ या जनावरांना होणाऱ्या आजाराकडे गंभीरतेने बघावं” अजित पवार
भाजप नेते किरीट सोमय्या गेल्या एक दोन वर्षापासून अनिल परब यांच्यावर आरोप करीत होते. तसेच साई रिसॉर्ट तोडण्यात यावं यासाठी ते कारवाईची मागणी करीत होते. या दरम्यानच्या काळात त्यांनी साई रिसॉर्टवर आंदोलने ,मार्चे देखील काढले होते. तसेच याप्रकरणाची इडीकडून चौकशी व्हावी अशी मागणी देखील त्यांनी मध्यंतरी केली होती.
“लाडू-पेढे पळवण्यासाठी कार्यकर्त्यांची झुंबड”; मुख्यमंत्र्यांची सभा चर्चेत
दरम्यान, मुरूड ता. दापोली येथील स.नं. 446 मधील साई रिसॉर्ट एनएक्स व सी. कौंच रिसॉर्ट बांधकामा व इमारती करीता पुरविलेल्या सोईसुविधा निष्कासन करणे व त्यानुषंगाने निर्माण होणारी संभाव्य मोडतोड आणि इतर सामग्री योग्य रितीने गोळा करून विल्हेवाट लावणे साठीचे व वापरात येणाऱ्या साहित्यांचे मुल्यांकन करणे करण्यात निविदा देण्यात आली होती.
Read also
- तो 12 हजार कोटींचा ‘दंड पेंग्विन’ सेनाप्रमुखांकडून वसूल करायचा का ?” भाजपचा सवाल
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाडले, राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि शेकापला खिंडार!
- “उद्धव ठाकरेच समाजाला आणि लोकांना चांगली दिशा दाखवू शकतात”
- “दिलेला शब्द पाळतो अन् एकदा शब्द दिला तर मी स्वत: पण ऐकत नाही”; एकनाथ शिंदे
- “पैठणचा बोक्या खोक्यावर जाणारा नाही”; रावसाहेब दानवे यांचं वक्तव्य