मुंबई : शिवसेनेचे नेते भास्कर जाधव हिंगोली दौऱ्यावर होते. यावेळी सभेत भास्कर जाधव यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. यासोबतच हिंगोलीत इतके चांगले प्रतिनिधी असताना उद्धव ठाकरेंनी हा अस्वल कुठून निवडला, असा घणाघाती टोला शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांना लगावला.
“उद्धव ठाकरेच समाजाला आणि लोकांना चांगली दिशा दाखवू शकतात”
मला उद्धव ठाकरेंचं एक कळलं नाही, हिंगोलीत इतके चांगले प्रतिनिधी असताना हे अस्वल कुठून निवडला त्यांनी? हा गडी रडला, शाप दिला, शिवसेना सोडून जाणारांच्या पोरांना बायका मिळाणार नाहीत म्हणाला. मात्र बहुमत चाचणीच्या दिवशी त्यांच्या सोबत जाऊन बसला. मला वाटलं तो चुकून गेला असेल तर त्यांच्यातला एक आमदार म्हणाला. रात्री आम्ही त्याला दाखवला खोका तवा इकडे आला बोका, असा टोला भास्कर जाधव यांनी लगावला.
“दिलेला शब्द पाळतो अन् एकदा शब्द दिला तर मी स्वत: पण ऐकत नाही”; एकनाथ शिंदे
संदिपान भुमरे यांना शिवसेनेनं सहा वेळा उमेदवारी दिली. त्यांना शिवसेनेने त्या ठिकाणी कॅबिनेट मंत्री केलं. तरी सुद्धा संदिपान भुमरे हे पुन्हा शिवसेनेला धोका देऊन, विश्वासघात करून, शिवसेना सो़डून गेले, ते कशा करता गेले? तर शेवटी काही मिळवले त्यातलं वाटलंच पाहिजे आणि म्हणून ते वाटत असतील त्यामुळे त्यामध्ये काय उपवासाचे कारण नाही. तर ती वस्तुस्थिती असेल, अशी टिका भास्कर जाधव यांनी संदिपान भुमरे यांच्यावर केली आहे.
“पैठणचा बोक्या खोक्यावर जाणारा नाही”; रावसाहेब दानवे यांचं वक्तव्य
हिंगोलीत वाढत्या जुगार, मटका अवैध धंद्यावर देखील भास्कर जाधव यांनी लक्ष केंद्रित केलं. ते म्हणाले, मला येथील पोलिसांना विचारायच आहे की, सगळेजण जर भर सभेत आमदाप बांगर मटका दारू जुगार चालवतात असा आरोप करत असतील तर याची दखल का घेतली जात नाही. मटका जुगार चालवणाऱ्यांनी कारवाई करा. नाहीतर मी विधानसभेत पोलिसांना धारेवर धरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा भास्कर जाधव यांनी दिला आहे.
Read also
- “दादा वॉशरूमला गेले होते रे, आता पुढच्या नाराजी पर्यंत तरी चर्चा बंद करा”
- “हिमंत असेल तर मोदी साहेबांचा फोटो न लावता निवडून येऊन दाखवा”; अजित पवार
- सोमय्यांचा घाव अनिल परबांवर बसला..! रिसोर्ट तुटणार, परब अडकणार..?
- तो 12 हजार कोटींचा ‘दंड पेंग्विन’ सेनाप्रमुखांकडून वसूल करायचा का ?” भाजपचा सवाल
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाडले, राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि शेकापला खिंडार!