पुणे : आगामी लोकसभा, विधानसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. पुणे शहरामध्ये देखील पक्षाकडून मोठे खांदेपालट करण्यात आले आहेत. शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी आज शहर कार्यकारणीची घोषणा केली आहे. यामध्ये औंध बाणेर बालेवाडी भागामध्ये मोठा जनसंपर्क तसेच विविध उपक्रमांच्या माध्यमातून सामान्य नागरिकांशी संपर्कात राहणारे लहू गजानन बालवडकर यांची चिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली आहे. घाटे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे आज सर्व नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.
हेही वाचा…सुषमा अंधारेंच्या विभक्त पतीवर ह’ल्ला, गाडीच्या काचाही फोडल्या, वाघमारे गंभीर जखमी
लहू बालवडकर हे गेली अनेक वर्षांपासून औंध बाणेर बालेवाडी भागामध्ये काम करत असून एका सामान्य शेतकरी कुटुंबातून पुढे आलेला कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे. विद्यार्थ्यांना साहित्य वाटप, भव्य रक्तदान शिबीर, मोफत आरोग्य तपासणी शिबीर, वृक्षारोपण, नवरात्री महोत्सव, भजन स्पर्धा अशा असंख्य उपक्रमाच्या माध्यमातून या भागातील जनतेशी त्यांचे जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले आहे. बालवडकर यांच्या जनसंपर्क कार्यालयातून आधार कार्ड दुरुस्तीपासून ते रुग्णांना आर्थिक मदत मिळवून देण्यापर्यंतचे कार्य सातत्याने केले जाते.
हेही वाचा…“ओबीसी आरक्षणाला धक्का नाही, कोणावरही अन्याय होणार नाही”, उपमुख्यमंत्र्यांनी आंदोलकांना दिली ग्वाही
दरम्यान, नियुक्तीनंतर बोलताना बालवडकर म्हणाले, गेली अनेक वर्षांपासून नागरिकांसाठी केलेल्या सेवाकार्याच्या कामाची शाबासकी आज पक्षाकडून मिळाल्यानंतर आनंद असून सामान्य कार्यकर्त्याला देखील महत्वाची जबाबदारी देण्याचे काम भारतीय जनता पार्टीतच होऊ शकते. पुणे शहराचे पालकमंत्री श्री. चंद्रकांत पाटील आणि शहराध्यक्ष धीरजजी घाटे यांनी माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्यावर दाखवलेला विश्वास येणाऱ्या काळामध्ये निश्चितच सार्थ ठरवेन.
READ ALSO :
हेही वाचा…काय सांगता..! ‘या’ राज्यात 1 उंदीर पकडण्यासाठी ४१,००० हजार रूपये झाले खर्च, आव्हाडांचा सरकारला जोरदार टोला
हेही वाचा…“शासनाच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण मिळत नाही”, चिठ्ठीत लिहून तरूणाची आ’त्म’ह’त्या’, सुप्रिया सुळेंची सरकारवर टिका
हेही वाचा…काॅंग्रेसने दिली ‘६’ गॅरंटी आश्वासने, कर्नाटकानंतर आता ‘या’ राज्यांवर नजर, सत्ता आल्यास पहिल्यास कॅबिनेट बैठकीत निर्णय
हेही वाचा…“रडायला भरपूर वेळ आहे, पण..,” अधिवेशनाच्या पूर्वीच मोदींचा विरोधकांना खोचक टोला
हेही वाचा…फडणवीस पेक्षा ठाकरे वरचढ..! फडणवीसांच्या ५ वर्षापेक्षा फक्त अडीच वर्षात ठाकरेंची कामगिरी दमदार