नांदेड : मागील काही दिवसापासून राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. मनोज जरांगे पाटलांना राज्य सरकारने एक महिन्याचा वेळ दिला आहे. परंतु त्याआधीच एका तरूणाने मराठा आरक्षणाचं खापर राज्य सरकारवर फोडून आत्महत्या केली आहे. शासनाच्या नाकर्तेपणामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही. असं म्हणत त्यांनी आत्महत्या केली आहे. त्यावर आता खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर टिका केली आहे.
हेही वाचा…दुष्काळी मराठवाड्याला मंत्रिमंडळ बैठकीत काय मिळाले?; पाहा संपूर्ण यादी…
नांदेड जिल्ह्यातील कामारी तालुका हिमायतनगर येथे काही मराठा बांधव मराठा आरक्षणासाठी मागील दोन दिवसापासून उपोषणाला बसले आहेत. यातच रविवारी रात्री बारा वाजेच्या सुमारास मराठा आरक्षण मिळत नसल्यामुळे एका तरूणाने गळफास घेऊन आत्महत्या केलीय. घटनास्थळी पोलिस पोहचले असता. त्याच्या जवळ एक चिठ्ठी सापडली. त्यात मी सुदर्शन ज्ञानेश्वर देवराये कामारी शासनाच्या नाकर्तेमुळे मराठा समाजास आरक्षण मिळत नसल्यामुळे आत्महत्या करत आहे. असे स्पष्टपणे लिहिलेलं आढळलं आहे.
हेही वाचा…मराठवाडा वॉटरग्रिडचा मुद्दा गाजला, फडणवीसांची ठाकरेंवर टिका, आता दानवेंनी फडणवीसांना दिलं जोरदार प्रत्युत्तर
दरम्यान, शासनाच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण मिळत नाही अशा आशयाची चिठ्ठी लिहून हिमायतनगर, जि. नांदेड येथील एका तरुणाने आत्महत्या केली. हि घटना अतिशय दुःखद आणि दुर्दैवी आहे. राज्य आणि केंद्र सरकारला मराठा आरक्षणाचा मुद्दा योग्य पद्धतीने हाताळण्यात सपशेल अपयश आले आहे. तरुणांच्या मनात नैराश्याची भावना निर्माण झाली आहे. हि अतिशय धोकादायक बाब आहे. माझे तरुणांना आवाहन आहे की, कृपया आपण कोणतेही टोकाचे पाऊल उचलू नये. आपल्या उर्जेची समाजाला गरज आहे. असं आवाहन सुप्रिया सुळे यांनी केलंय.
READ ALSO :
हेही वाचा…काॅंग्रेसने दिली ‘६’ गॅरंटी आश्वासने, कर्नाटकानंतर आता ‘या’ राज्यांवर नजर, सत्ता आल्यास पहिल्यास कॅबिनेट बैठकीत निर्णय
हेही वाचा…“रडायला भरपूर वेळ आहे, पण..,” अधिवेशनाच्या पूर्वीच मोदींचा विरोधकांना खोचक टोला
हेही वाचा…फडणवीस पेक्षा ठाकरे वरचढ..! फडणवीसांच्या ५ वर्षापेक्षा फक्त अडीच वर्षात ठाकरेंची कामगिरी दमदार
हेही वाचा…सुषमा अंधारेंच्या विभक्त पतीवर ह’ल्ला, गाडीच्या काचाही फोडल्या, वाघमारे गंभीर जखमी
हेही वाचा…“ओबीसी आरक्षणाला धक्का नाही, कोणावरही अन्याय होणार नाही”, उपमुख्यमंत्र्यांनी आंदोलकांना दिली ग्वाही