मुंबई : राज्यसभेच्या निवडणुकीकरीता महाविकास आघाडीतील शिष्टमंडळ राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेले होते. राज्यसभेची निवडणुक ही सहा जागेसाठी होत आहे, मात्र भाजपने आपला तिसरा उमेदवार मागे घ्यावा, याचा प्रस्ताव महाविकास आघाडीकडून देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आला आहे. मात्र भाजपने हा प्रस्ताव नकारला असून तिसरी जागा लढविण्यावर भाजप ठाम आहे.
राज्यसभेसाठी भाजपचे पारडे जड; भाजपच्या गळाला आणखी तीन आमदार..!
भाजप हा राष्ट्रीय पक्ष असून त्याला राज्यसभेची जागा खुप महत्वाची आहे. संख्याबळानुसार त्यांच्यापेक्षा आमच्याकडे जास्त आमदार आहेत. त्यामुळे आम्ही 3 जागा लढविण्यावर ठाम आहोत. त्यानंतर त्यांना राज्यसभेच्या निवडणुकीत तिसरा उमेदवार घेण्याचा सल्ला दिला. तसेच विधानपरिषदेच्या निवडणुकीत आम्ही तिसरा उमेदवार मागे घेऊ, असा प्रस्ताव आम्ही त्यांच्यासमोर ठेवला. त्यानंतर ते विचार करून निर्णय घेऊ, असं त्यांनी म्हटलं आहे. असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
“साकीनाका बलात्कार प्रकरणाच्या निकालामुळे न्यायव्यवस्थेवरील विश्वास दृढ होईल”; गृहमंत्री
राज्यसभेच्या निवडणुकीचा प्रस्ताव मान्य केला नाही तर ही निवडणुक होणार आणि ती जिंकणार देखील अशी आशा देखील त्यांनी व्यक्त केली. यांसंदर्भात आम्ही पक्ष नेतृत्वाबाबत ही चर्चा केली असून. त्यांनी देखील आमची भूमिका मान्य केली आहे. त्याचबरोबर महाविकास आघाडीतील चर्चा ही खेळीमेळीने झाली आहे. त्यानंतर ते काय भूमिका घेणार त्याकडे पहावं लागणार,असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.
“छगन भुजबळ OBC आरक्षणावरून तोंडघशी पडतील; आघाडीच्या एका गटाला आरक्षण नकोय”
दरम्यान, राज्यसभेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून संजय पवार यांना तर भाजपकडून धनंजय महाडिक यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपचे दोन, तर आघाडीतील तिन्ही पक्षाचे प्रत्येकी एक उमेदवार निवडणुन येणार मात्र सहाव्या जागेसाठी चुरस बघायला मिळणार आहे. उमेदवारांना अर्ज मागे घेण्यास काही तास शिल्लक राहिले आहेत. तसेच या निवडणुकीसाठी १० जून रोजी मतदान होत आहे. तसेच विधान परिषदेच्या १० जागांसाठी येत्या २० जून रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये कशा पद्धतीची तडजोड होणार त्याकडे लक्ष आहे. तसेच या निवडणुकांमध्ये कोणता उमेदवार बाजी मारणार ते पण पाहाणं महत्वं ठरणार आहे.
Read also:
- “फडणवीसांसोबत सकारात्मक चर्चा झाली”; भाजप राज्यसभेच्या निवडणुकीतून उमेदवार मागे घेणार का?
- राज्यसभेची जागा सोडा, विधान परिषदेची जागा घ्या ; महाविकास आघाडीकडून भाजपला ऑफर
- राज ठाकरेंच्या आदेशानंतर पत्रकं वाटायला गेलेल्या मनसेच्या कार्यकर्त्याला अटक
- अपक्ष डाव टाकणार की डाव साधणार?; चंद्रकांत पाटलांचे मोठे विधान
- आमदार लक्ष्मण जगतापांची रूग्णालयातून घरात जोरात एन्ट्री, विरोधक मात्र कोमात