पुणे : पिंपरी-चिंचवडच्याच नव्हे तर पुणे जिल्ह्याच्या राजकारणातील ध्रुवतारा, डिसीजन मेकर, मुरब्बी नेता, मार्गदर्शक अशी ओळख असलेले व्यक्तिमत्व म्हणजे भारतीय जनता पक्षाचे माजी शहराध्यक्ष तथा विद्यमान आमदार लक्ष्मण जगताप. गेल्या पन्नास दिवसांपासून बाणेर येथील रुग्णालयात उपचार घेत होते. त्यांच्या प्रकृतीत चांगली सुधारणा झाल्यामुळे गुरुवारी डॉक्टरांनी त्यांना डिस्चार्ज दिला आणि भाऊ घरी परतले. यावेळी कार्यकत्यांनी, ‘भाऊ, तुम आगे बढों, हम तुमारे साथ है’च्या घोषणा दिल्या. घरातील गृहलक्ष्मीनी त्यांचे औक्षण केले. रामायण काळात रावणाला नामोहरम करून अयोद्धेत परतलेल्या रामासोबत लक्ष्मणाचे स्वागत झाले होते, तशाच विकाररूपी रावणावर विजय मिळवलेल्या लक्ष्मणभाऊची जोमात एंट्री झाली, मात्र, विरोधक कोमात गेले. त्यांच्या काळ्या मनसुब्यांवर पाणी फिरले. डॉक्टरांचे उपचार आणि शहरातील जनता, कार्यकर्ते, हितचिंतकांचे प्रेम व प्रार्थना यामुळे भाऊंची प्रकृती चांगली असून लवकरच ते राजकीय निर्णय प्रक्रियेत सक्रीय होतील, कार्यकत्यांना भेटतील, असे आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू तथा माजी नगरसेवक शंकरशेठ जगताप यांनी सांगितले.
भाजपचे महाडिक विजयी होणार, आणि महाविकासआघाडीचा बडा नेता घरी बसणार
महापालिका निवडणुकीची आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर तिसऱ्याच दिवशी लक्ष्मणभाऊंना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणे तेही सकलजनाचे नाथ आदिनाथ भगवान दत्तात्रेय व शिर्डीचे संत साईबाबा यांच्या उपासनेचा वार असलेल्या गुरुवारी गुरुवार या शब्दांतच गुरु शब्द दडलेला आहे. आणि लक्ष्मणभाऊ राजकारणातील अनेकांचे गुरू आहेत, हे यापूर्वीच सिद्ध झाले आहे. त्यामुळे गुरुवारीच भाऊंना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणे आणि गणपतीचा वार असलेल्या मंगळवारी आरक्षण सोडत निघणे हा निव्वळ योगायोग नसून हे परमेश्वरी संकेत आहेत. कारण, गणपती म्हणजे विद्येची देवता कोणतेही कार्याचा आरंभ करताना आपण श्रीगणेशाची पूजा करतो, त्यामुळे मंगळवारीची सोडत म्हणजे राजकारणात पुनः हरिओम करण्याचा पुनः श्रीगणेशा करण्याचा लक्ष्मणभाऊंना मिळालेला संकेत आहे. आणि त्यांना गुरुवारी मिळालेला डिस्चार्ज ही गुरुदक्षिणा आहे.
राज्यसभा निवडणूकिसाठी फडणवीसांची मोर्चेबांधणी, अपक्ष आमदरांना गळाला लावणार?
गेल्या पन्नास दिवसांपासून लक्ष्मणभाऊ यांच्यावर बाणेर येथील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. ते रुग्णालयात दाखल झाल्याची बातमी वानव्यासारखी पसरली होती. त्यानंतर राज्यभरातून सर्वपक्षीय नेत्यांसह शहरातील कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयात धाव घेतली होती. कुटुंबीयांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली जात होती. यामध्ये माजी मुख्यमंत्री तथा विधानसभा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, केंद्रीय आरोग्यमंत्री भारतीताई पवार, माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी इंजेक्शन आणण्यासाठी मदत केली. भाजपतील नेते प्रविण दरेकर, रावसाहेब दाणये पाटील यांच्यासह केंद्रीय राज्यमंत्री रामदासजी आठवले, नारायण राणे, नीलेश राणे, विजय वडेट्टीवार, मिलिंद नार्वेकर, बाळा नांदगावकर, नितीन देसाई, भाई जगताप, माधुरी मिसाळ, गिरीश बापट, खासदार श्रीरंग बारणे, बाळा भेगडे, आमदार सुनील शेळके, भाजपचे शहराध्यक्ष तथा आमदार महेशदादा लांडगे, बापू पठारे, चंद्रकांत मोकाटे, आमदार अण्णा बनसोडे, जगदीश मुळीक, भिमराव तापकीर, आझमभाई पानसरे, संजय जगताप, प्रविण तरडे आदींचा समावेश होता.
राज्यसभा निवडणुक; नवाब मलिक, अनिल देशमुखांसाठी अजित पवार न्यायालयात जाणार ?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही रुग्णालयात भेट देऊन लक्ष्मणभाऊंची भेट घेऊन मैत्रीधर्म निभावला होता. भाजपच्या सर्व नेत्यांनी भाऊंसाठी इंजेक्शन आणण्यासह सर्वप्रकारची मदत केली, पुणे जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व धर्मीय चाहत्यांनी नागरिकांनी भाऊंच्या आरोग्यासाठी प्रार्थना, होमहवन केले. या सर्वांचा परिपाक म्हणून आणि डॉक्टरांचे प्रयत्न व परमेश्वराचे वरदान म्हणून भाऊंची प्रकृती आता चांगली सुधारली आहे. हजारो कार्यकत्यांनी त्यांचे पिंपळे गुरव येथील निवासस्थानाबाहेर स्वागत केले. त्यांचे संपूर्ण कुटुंबीय आणि त्यांच्या प्रेम करणारे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. अधिनीताई जगताप, शुभांगीताई जगताप व जयश्रीताई जगताप यांनी भाऊंचे औक्षण केले. यावेळी माजी महापौर उषा उर्फ माई ढोरे, माजी नगरसेविका झामाबाई बारणे, उषाताई मुंडे, शारदाताई सोनवणे, जयश्रीताई गावडे, अधिनीताई चिंचवडे, मनीषाताई पवार आदी उपस्थित होत्या.
कार्यकर्त्यांना आवाहन:
डॉक्टरांनी भाऊंना काही दिवस आराम करण्याचा सल्ला दिला आहे. भाऊ लवकरच पुन्हा नव्या जोमाने आपल्या कामाला सुरुवात करतील, त्यावेळी ते सर्वानाच भेटतील. आता त्यांना विश्रांतीची गरज आहे. त्यामुळे त्यांच्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते व हितचिंतकांनी त्यांना भेटण्यासाठी निवासस्थानी गर्दी करू नये. कार्यकत्यांनी आपापल्या परिसरात जनसेवा अखंड सुरू ठेवावी, असे आवाहन माजी नगरसेवक शंकर जगताप यांनी केले आहे.
Read also:
- राज्यसभेसाठी भाजपचे पारडे जड; भाजपच्या गळाला आणखी तीन आमदार..!
- “साकीनाका बलात्कार प्रकरणाच्या निकालामुळे न्यायव्यवस्थेवरील विश्वास दृढ होईल”; गृहमंत्री
- “छगन भुजबळ OBC आरक्षणावरून तोंडघशी पडतील; आघाडीच्या एका गटाला आरक्षण नकोय”
- भाजपचा ‘जल आक्रोश’ अखेर मुख्यमंत्र्यांनी ऐकला, औरंगाबादचा पाणी प्रश्न सुटणार..
- “राज्यसभेच्या निवडणुकीसारखं, विधान परिषदेच्या निवडणुकीतही ‘भाजप’ आघाडीला रडवणार”