मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात सध्या जोरदार राजकीय संघर्ष बघायला मिळत आहे. शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना साधा ट्विटपण करता येत नाही. असा टोला लगावला होता. आता त्याच पार्श्वभूमीवर भाजप नेते निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे आणि विनायक राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.
ठाकरेंसाठी दोन दिवसाआधी ढसाढसा रडल्या, पाटील आलेत अन् सेनेचा दिला थेट राजीनामा
तो खासदार विन्या राऊत कोण किती शिकला आहे आणि कोणाला ट्विट करता येत नाही ते हा सांगतो आहे. हा स्वत:चा दहावी दोनदा नापास झाला आहे. जवळपास शिवसेनेच्या बारा वर्षाच्या सत्तेत याला एकदाही साधा राज्यमंत्री केला नाही. अन् हा मुख्यमंत्र्यांवर टिका करतोय, असा टोला निलेश राणे यांनी विनायक राऊतांवर लगावला आहे. तसेच आदित्य ठाकरे यांनी आजपासून निष्ठा सभेचे आयोजन केलं आहे. त्यावर बोलताना आजपासून पेंग्विनने चेष्टा यात्रा सुरू केली आहे असाही टोला त्यांनी लगावला.
मंत्रिमंडळाचा फार्म्युला दिल्लीत ठरणार; एकनाथ शिंदे फडणवीस शहा, मोदींना भेटणार
उद्धव ठाकरे यांना एकट पाडण्याचा डाव 40 चोरट्यांच्या माध्यमातुन भाजप खेळत असेल तर अलिबाबा गुहा पोखरून शिवसैनिक भगवा झेंडा फडकावल्याशिवाय राहणार नाही. धनुष्य यांच्या बापजादाने निर्माण केलेला नाही. धनुष्यबाण बाळासाहेबांचा आहे. त्यामुळे त्यांच्यावर फक्त उद्धव ठाकरे यांचा हक्क आहे. असं विनायक राऊत यांनी म्हटलं आहे. तसेच एकनाथ शिंदे यांच्याबाबत त्यांनी त्यांना साधा एक ट्विट देखील करता येत नाही. अशी खोचक टिप्पणी केली होती.
“खंजीर काळजात घुसवला, शांतपणे आपण वर्षा सोडला”; मुस्लिम बांधवांचं उद्धव ठाकरेंना पत्र
दरम्यान, कायद्याच्या दृष्टीने धनुष्यबाण कुणी हिरावून घेऊ शकत नाही. पण नुसत धनुष्यबाण चिन्ह असलेल्या माणसाचा लोक मतदानात विचार करतात. धनुष्यबाण कुणी दूर करु शकत नाही. नगरसेवक गेले, पण महापालिका अस्तित्वात नाही. गेले ते त्यांचे समर्थक होते. काल शिवसेना महिला जिल्हा प्रमुख त्यांच्या डोळ्या अश्रु होते. शिवसेनेने आजवर साध्या माणसाला मोठे केले ह्याचा अभिमान असायला हवा. यांच्यामुळे ज्यांना मोठेपण मिळाले ते गेले. साधी माणसं जोवर शिवसेनेसोबत तोवर धोका नाही. असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
Read also
- “उद्धव साहेब..! आता भोंगा हे नवं चिन्ह पक्षासाठी निवडा”; मनसेने पुन्हा एकादा सेनेला डिवचलं
- “उद्धव साहेब..! आता भोंगा हे नवं चिन्ह पक्षासाठी निवडा”; मनसेने पुन्हा एकादा सेनेला डिवचलं
- कल्याण डोबिंवलीतील 55 नगरसेवकही शिंदे गटाच्या वाटेवर; ठाकरेंना अजून एक मोठा धक्का
- बंडखोर आमदारांविरोधात आदित्य ठाकरे मैदानात: ‘मिशन 236’ अंतर्गत कार्यकर्त्यांशी संवाद साधणार
- “कायद्याच्या लढाईत अपयश आल्यास नव्या चिन्हाची तयारी ठेवा”; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना सुचना