मुंबई : बाळासाहेबाच्या शिवसेनेचं धनुष्यबान हे चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडे जाणार अशी चिन्ह दिसत आहेत. गेल्या महिन्यात शिवसेनेत 40 आमदारांच्या बंडानंतर शिवसेनेत मोठी फुट पडली आहे. यापाठोपाठ शिवसेनेला अजुन एक धक्का बसणार असल्याच समोर येत आहे. शिवसेनेच धनुष्यवान हे चिन्ह कोणाकडे राहणार याचा निकाल 11 जुलैला लागणार आहे शिंदे गटाच्या बाजुने हा निकाल लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील सावध भूमिका घेत कार्यकर्त्यांना सावध राहण्याचा इशारा दिला आहे.
“मी कधीच कुणासमोर लोटागंण घालत नाही”; बंडखोर आमदाराचं राऊतांना प्रत्युत्तर
“कायद्याने जी लढाई लढायची आहे, ती लढुच. मात्र कायद्याची लढाईत अपयश आल्यास गाफील न राहता नव्या चिन्हाची तयारी ठेवा आणि कमी वेळेत घरा घरात पोहचवा” असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे. तर धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटालाच मिळणार, त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी नैसर्गिक युतीला पाठिंबा द्यावा, असं बंडखोर आमदार शंभुराजे देसाई यांनी म्हटलं आहे. तसेच आदित्य ठाकरे यांनी संजय राऊतांची भाषा करू नये, असंही ते म्हणाले.
“चमत्कार बाबा संजय राऊतांमुळेच ठाण्यात एकच नगरसेवक शिल्लक राहिला”
उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी संवाद साधल्यास पक्षचिन्हांचा प्रश्न सुटतील असं वक्तव्य दिपक केसरकर यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता धनुष्यबाण या चिन्हावरून शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये कायदेशीर लढाई सुरू झाली आहे. त्याचा निकाल येत्या ११ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीत लागणार आहे. त्याचाच भाग म्हणून आज उद्धव ठाकरे दुपारी २ वाजता पत्रकार परिषद घेणार आहे.
“भाजप अन् शिवसेनेमध्ये आता लव्ह मॅरेज झालंय”; दिपक केसरकरांंचं वक्तव्य
दरम्यान, शिवसेनेच्या बंडखोर आमदारांवर अपात्रतेसंदर्भात शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यामध्ये एकनाथ शिंदे गटातील १६ आमदारांवर अपात्रतेची कारवाई करावी असं शिवसेनेने दाखल केलेल्या याचिकेत म्हटलं आहे. त्याचा निर्णय ११ जुलै रोजी लागणार आहे. त्याचबरोबर शिवसेनेच्या पक्ष चिन्हाबाबत देखील सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्याचपार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना सावध राहण्याचा इशारा दिला आहे.
Read also
- ठाकरेंसाठी दोन दिवसाआधी ढसाढसा रडल्या, पाटील आलेत अन् सेनेचा दिला थेट राजीनामा
- मंत्रिमंडळाचा फार्म्युला दिल्लीत ठरणार; एकनाथ शिंदे फडणवीस शहा, मोदींना भेटणार
- “खंजीर काळजात घुसवला, शांतपणे आपण वर्षा सोडला”; मुस्लिम बांधवांचं उद्धव ठाकरेंना पत्र
- काॅंग्रेसच्या ‘त्या’ सात आमदारांवर कारवाई होणार; पृथ्वीराज चव्हाणांची हायकमांडकडे तक्रार
- “काय तो छत, काय तो आमदार निवास, आता कसं इथं राहायचं”; शहाजी बापूंच्या रूमचं छत कोसळलं