मुंबई : शिवसेनेच्या आमदारांसोबत आता नगरसेवक देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होतांना दिसत आहे. ठाण्यातील तब्बल 66 नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन पाठिंबा दर्शविला. तर पुण्यात देखील शिवसेनेला मोठा खिंडार पडला आहे. त्यातच दोन दिवसांपुर्वी ढसाढसा रडलेल्या महिला कार्यकर्त्यींनी देखील शिवसेनेच्या पदाधिकारीचा राजीनामा देत एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होणार आहेत.
“चमत्कार बाबा संजय राऊतांमुळेच ठाण्यात एकच नगरसेवक शिल्लक राहिला”
उद्धव ठाकरे यांच्या समर्थकांनी अवघ्या दोन आठवड्यांपूर्वी शहरात काढलेल्या मोर्चात बंडखोरांनी दगा दिला. त्यामुळे महिला महानगरप्रमुख शोभा चौधरी ह्या ढसाढसा रडल्या होत्या. त्यानंतर त्यांनी गुरूवारी वृद्धत्व आणि प्रकृती अस्वास्थ्य याची कारणे देत त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता शिवसेनेला गळती अजूनही सुरूच आहे. शहरप्रमुख ज्योती शिवदे यांनीही वैयक्तिक कारण देत पदत्याग केला आहे. आपण शिवसैनिक म्हणून कार्यरत राहणार आहोत, असे त्यांनी म्हटले आहे.
“भाजप अन् शिवसेनेमध्ये आता लव्ह मॅरेज झालंय”; दिपक केसरकरांंचं वक्तव्य
शिंदे गटातील आमदार गुलाबराव पाटील बुधवारी पाळधीत आले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी शोभा चौधरी यांनी शिवसेनेच्या महिला महानगरप्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे. त्याआधी विधानभवनात बहुमत सिद्ध करण्याआधीच आमदार संतोष बांगर हे देखील एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले होते. बंडखोरीनंतर ते उद्धव ठाकरे यांच्यासोबत होते. त्याआधी झालेल्या सभेत ते देखील रडले होते. शहरप्रमुख ज्योती शिवदे यांनीही वैयक्तिक कारण देत पदत्याग केला आहे. आपण शिवसैनिक म्हणून कार्यरत राहणार आहोत, असे त्यांनी म्हटले आहे.
भास्करराव जाधवनंतर आता नितेश राणेंही शेतात राबतोय; राणेंनी बांधावरच केली न्याहारी
दरम्यान, दिल्लीहुन आल्यानंतर मुख्यमंत्री पंढरपुर येथे 10 जुलैला विठ्ठालाची शासकीय पुजा करणार आहेत. त्यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस देखील जाणार आहे. त्यामुळे दिल्लीत किती मंत्रिपदे, खाती दिली जातील याबाबत शिंदे फडणवीस यांच्यात चर्चा झाली आहे. दिल्लीत त्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर राष्ट्रपती निवडणुकीबाबत देखील शिंदे भाजपला पाठिंबा देण्याची शक्यता आहे.
Read also
- मंत्रिमंडळाचा फार्म्युला दिल्लीत ठरणार; एकनाथ शिंदे फडणवीस शहा, मोदींना भेटणार
- “खंजीर काळजात घुसवला, शांतपणे आपण वर्षा सोडला”; मुस्लिम बांधवांचं उद्धव ठाकरेंना पत्र
- काॅंग्रेसच्या ‘त्या’ सात आमदारांवर कारवाई होणार; पृथ्वीराज चव्हाणांची हायकमांडकडे तक्रार
- “काय तो छत, काय तो आमदार निवास, आता कसं इथं राहायचं”; शहाजी बापूंच्या रूमचं छत कोसळलं
- “मी कधीच कुणासमोर लोटागंण घालत नाही”; बंडखोर आमदाराचं राऊतांना प्रत्युत्तर