मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर उर्वरित मंत्रिमंडळाचा शपथविधी हा 12 जुलैला होण्याची शक्यता आहे. शिंदे सरकारमध्ये कुणाला कोणती खाती येणार याचा फार्म्युला ठरलेला असून शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार आहेत. त्याठिकाणी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेऊन ते महाराष्ट्रात येणार आहेत.
“भाजप अन् शिवसेनेमध्ये आता लव्ह मॅरेज झालंय”; दिपक केसरकरांंचं वक्तव्य
मुख्यमंत्री पदाचा शपथविधी झाल्यानंतर उर्वरित मंत्रिमंडळाचा शपथविधी कधी होणार याची उत्सुकता सगळ्यांच लागून आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे शुक्रवारपासून दोन दिवस दिल्लीला जात आहेत. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची भेट घेतील. या भेटीत ते रखडलेले प्रकल्प, मंत्रिमंडळ विस्तार, मंत्रिबाबत फार्म्युला याबाबत चर्चा करतील. अशी सुत्रांनी माहिती दिली आहे.
भास्करराव जाधवनंतर आता नितेश राणेंही शेतात राबतोय; राणेंनी बांधावरच केली न्याहारी
दिल्लीहुन आल्यानंतर मुख्यमंत्री पंढरपुर येथे 10 जुलैला विठ्ठालाची शासकीय पुजा करणार आहेत. त्यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस देखील जाणार आहे. त्यामुळे दिल्लीत किती मंत्रिपदे, खाती दिली जातील याबाबत शिंदे फडणवीस यांच्यात चर्चा झाली आहे. दिल्लीत त्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर राष्ट्रपती निवडणुकीबाबत देखील शिंदे भाजपला पाठिंबा देण्याची शक्यता आहे.
उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदेंचा जोरचा झटका..! ठाण्यातील तब्बल ६६ नगरसेवक फुटले
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला खिंडार पाडल्यानंतर आता उद्धव ठाकरेंकडून पुन्हा एकदा पक्षबांधणी सुरू आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे हे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकांमध्ये उपस्थित राहुन संवाद साधत आहेत. यातच आज परभणी येथील मुस्लिम बांधवांनी उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून पाठिंबा दर्शविला आहे. त्यात पत्रात त्यांनी अनेक महत्वाच्या गोष्टींचा त्यांनी उल्लेख केला आहे.
Read also
- “खंजीर काळजात घुसवला, शांतपणे आपण वर्षा सोडला”; मुस्लिम बांधवांचं उद्धव ठाकरेंना पत्र
- काॅंग्रेसच्या ‘त्या’ सात आमदारांवर कारवाई होणार; पृथ्वीराज चव्हाणांची हायकमांडकडे तक्रार
- “काय तो छत, काय तो आमदार निवास, आता कसं इथं राहायचं”; शहाजी बापूंच्या रूमचं छत कोसळलं
- “मी कधीच कुणासमोर लोटागंण घालत नाही”; बंडखोर आमदाराचं राऊतांना प्रत्युत्तर
- “चमत्कार बाबा संजय राऊतांमुळेच ठाण्यात एकच नगरसेवक शिल्लक राहिला”