मुंबई : शिवसेनेतील 40 आमदारांच्या बंडानंतर सेनेत मोठी फुट पडली. त्यामुळे शिवसेना पक्षाचे धनुष्यबान हे चिन्ह कोणाकडे जाणार हा प्रश्न उपस्थित झाला आहे. शिवसेनेच्या 16 बंडखोर आमदारांवर आपात्रतेची कारवाई करावी अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर 11 जुलै रोजी सुनावणी होणार आहे. तसेच या याचिकेचा निकाल हा शिंदे गटाकडे लागण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर आता मनसे नेते गजानन काळे यांनी उद्धव ठाकरे यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.
“खंजीर काळजात घुसवला, शांतपणे आपण वर्षा सोडला”; मुस्लिम बांधवांचं उद्धव ठाकरेंना पत्र
उद्धव ठाकरे यांनी काल शिवसेनेच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना सावध राहण्याचा इशारा दिला आहे. कायदेशीर लढाईत आपल्याला अपयश आलं तर गाफिल राहु नका, नवीन चिन्ह घराघरात पोहचवण्यासाठी तयार रहा. असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. त्यावर आता उद्धव साहेब हेच नवं चिन्ह निवडा. किमान दिवसातून 5 वेळा तरी वाजेल, असं ट्विट करत त्यांनी भोंग्याचा फोटोही ट्विट केला आहे.
काॅंग्रेसच्या ‘त्या’ सात आमदारांवर कारवाई होणार; पृथ्वीराज चव्हाणांची हायकमांडकडे तक्रार
शिवसेना आणि मनसेतील राजकीय वाद सोशल मीडियावर कायम चर्चेचा विषय राहिला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेनेच्या पक्ष चिन्हांवरून मनसेने शिवसेनेला डिवचलं आहे. मुंबईत मनसेचे ६ नगरसेवक शिवसेनेने फोडले होते. आज शिवसेनेचे ६६ नगरसेवक शिंदे गटात गेले आहेत. भविष्यात किती राहतील माहीत नाही. शिल्लक सेनेला शुभेच्छा, असा देखील टोला लगावला आहे.
“काय तो छत, काय तो आमदार निवास, आता कसं इथं राहायचं”; शहाजी बापूंच्या रूमचं छत कोसळलं
दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीमुळे शिवसेनेला गळती सत्र सुरू झालं आहे. अनेक आमदारांसोबत नगरसेवक देखील एकनाथ शिंदे यांच्या वाटेवर जात आहेत. त्यामुळेच आदित्य ठाकरे आज शिवसेनेच्या 236 शाखांना भेटी देणार आहेत. सेनेच्या 236 शाखा, गटप्रमुख, शाखाप्रमुख, कार्यकर्ते यांची आदित्य ठाकरे भेट घेऊन संवाद साधणार आहेत. सेनेच्या एकनिष्ठ कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना बळ देण्याचा प्रयत्न यानिमित्तानं केला जाणार आहे. शिवसेनेच्या फाटाफुटीनंतर आदित्य ठाकरे हे आता पक्षासाठी निष्ठा यात्रा करत आहेत. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनाही ते भेटणार आहेत. याची सुरुवात बंडखोर आमदार यामिनी जाधव यांच्या भायखळा मतदार संघातुन आदित्य ठाकरे करणार आहेत.
Read also
- कल्याण डोबिंवलीतील 55 नगरसेवकही शिंदे गटाच्या वाटेवर; ठाकरेंना अजून एक मोठा धक्का
- बंडखोर आमदारांविरोधात आदित्य ठाकरे मैदानात: ‘मिशन 236’ अंतर्गत कार्यकर्त्यांशी संवाद साधणार
- “कायद्याच्या लढाईत अपयश आल्यास नव्या चिन्हाची तयारी ठेवा”; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना सुचना
- ठाकरेंसाठी दोन दिवसाआधी ढसाढसा रडल्या, पाटील आलेत अन् सेनेचा दिला थेट राजीनामा
- मंत्रिमंडळाचा फार्म्युला दिल्लीत ठरणार; एकनाथ शिंदे फडणवीस शहा, मोदींना भेटणार