मुंबई : महामारीसोबतच आता नव्याने पसरत असलेल्या डेल्टा व्हेरिएंटमुळे राज्यात पुन्हा एकदा जुनेच निर्बंध परत नव्याने लागू, परंतु वेगळ्या रचनेत लागू करण्यात आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर आजपासून अत्यावश्यक सेवा वगळता, सगळी दुकाने दुपारी ४ पर्यंतच सुरु ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आलेला आहे.
नाहीतर तिसरी लाट येण्याआधी दुसरी लाट उलटेल, मुख्यमंत्र्यांनी दिला गंभीर इशारा
दरम्यान, आता यावरुन भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी आघाडी सरकारवर जोरदार हल्लबोल केला आहे. राज्यात गेल्या १५ महिन्यांत वेगवेगळ्या पध्दतीने लॉकडाऊन, कडक निर्बंध लावले जात आहेत. या कडक निर्बंधांमुळे, सामान्य माणसासमोर जगायचं कसं, हा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. समाजात मोठ्या प्रमाणावर असंतोष पसरत आहे आणि तोच प्रगट होईल, या भीतीपोटी या सरकारने तिसऱ्या लाटेची दहशत पसरवत, राज्यात सामाजिक आणीबाणी लागू करत आहे,” असा घणाघात त्यांनी केला आहे.
मराठा आरक्षण, ओबीसींचे राजकीय आरक्षण टिकवण्यात सरकारला अपयश आले आहे. सरकारच्या धोरणहीन कारभारामुळे तरुणांसमोर बेकारीचे संकट निर्माण झाले आहे. या सगळ्यामुळे राज्यातील सर्वच घटकांत सरकारविरोधात कमालीचा असंतोष खदखदत आहे. त्यांचे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष आहे, राज्यात रोजगाराचे, छोट्या व्यावसायिकांचे, व्यापारी वर्गाचे प्रश्न सोडवले जात नसल्याने जनता जेरीस आली आहे, अश्या संतप्त जनतेला तोंड देण्याचे धाडस या सरकारमध्ये नाही. त्यामुळे हा पळपुटेपणाचा मार्ग सरकारने स्वीकारला आहे,” अशी टीका त्यांनी केली आहे.
दुसरी लाट, तिसरी लाट अशी भिती जनतेच्या मनात निर्माण करून, जनतेवर निर्बंध लादत, त्यांना घरी बसवून ठेवण्याचा प्रयत्न आघाडी सरकार करत आहे. पण, त्यांनी जगायचं कसं? हा प्रश्न सोडवण्यासाठी सरकार कोणताही प्रयत्न करत नाहीये. सतत लॉकडाऊन करूनही सर्वाधिक रूग्ण, मृत्यू आणि प्रभावी उपाययोजनांचा अभाव, याबाबतीत राज्याचाच पहिला क्रमांक लागतो,” असा हल्लाबोल त्यांनी सरकारवर केला आहे.
Read Also :
- वडेट्टीवार म्हणाले, “ओबीसी असल्याने महसूल खातं मिळत नाही”, थोरात म्हणतात…
- “वेगळा विदर्भ होत नाही तोपर्यँत लग्न करणार नाही, फडणवीस म्हणाले होते, त्याचं काय झालं?”
- अजित पवार मुर्दाबाद..; सुप्रिया सुळेंसमोरच आंबील ओढ्यातील नागरिकांच्या जोरदार घोषणा
- ‘साहेब शिवसेना वाचवा, माझ्या मोठ्या साहेबांचा शिवसैनिक वाचवा’ कट्टर शिवसैनिकाने फोडला टाहो
- शरद पवारांच्या पायाला दुखापत; गाड्या घातल्या थेट ‘रेस ट्रॅक’वर