मुंबई : देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सरकार आल्यानंतर सातत्याने विरोधकांवर धाडी टाकल्याचा आरोप केला जात आहे. केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर मोठ्या प्रमाणात झाल्याचा आरोपही केला जात आहेत. मात्र या अपवाद म्हणून कर्नाटकात एक गोष्ट घडली आहे. कर्नाटकच्या राजकारणात खळबळ निर्माण करणारी घटना घडली असून भाजप आमदाराचा पुत्र ४० लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडला आहे.
हेही वाचा..““रोज उठा आदित्यांना शिव्या द्या, अन् प्रसिद्धी मिळवा, मनसेचा हा नवा धंदा,” आदित्य ठाकरेंची बोचरी टिका
बेंगळुरू पाणीपुरवठा आणि मलनिस्सारण मंडळाचे मुख्य लेखाकार व्ही प्रशांत मदल यांना कर्नाटक लोकायुक्तच्या अधिकाऱ्यांनी ४० लाखांची लाच घेता रंगेहाथ पडकले आहे. रंगेहाथ पकडल्यानंतर लोकायुक्ताकडून तपास मोहीम राबवण्यात आली. आणि प्रशांत मदलकडून ६ कोटीहून अधिकच रोकड जप्त करण्यात आली आहे. प्रशांत मदल हे चन्नगिरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार के. मदल विरूपक्षप्पा यांचा पुत्र आहेत. ही कारवाई एका माहितीच्या आधारावर करण्यात आली आहे.
हेही वाचा..“रोग हाल्याला, इंजेक्शन पखालीला,” एसटी कर्मचाऱ्याला निलंबित केल्यानंतर अजित पवारांचा संताप
जयनगरमधील डॉलर्स कॉलनीत प्रशांत यांच्या घरावर छापा टाकला. गुरूवारी सकाळी या प्रकरणी तक्रारीवरून एपआयआर दाखल करण्यात आला होता. आमदार पुत्राने ज्या व्यक्तीकडून ८१ लाखांची लाच मागितली होती. त्याने केलेल्या तक्रारीवरून एफआयआर आधीच दाखल करण्यात आला होता, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. यानंतर लोकायुक्त अधिकाऱ्यांनी प्रशांत यांच्या घरी छापा टाकला. त्या ठिकाणी ६ कोटीची रोकड आढळून आली असून ती जप्त करण्यात आली आहे. निविदा मंजूर करण्यासाठी प्रशांत यांनी ८१ लाखा रूपयांची लाच मागितली होती. यात ४० लाखांची लाच स्विकारताना त्यांच्या कार्यालयात त्यांना रंगेहाथ पकडण्यात आलं. प्रशांत यांना लोकायुक्ताकडून ताब्यात घेण्यात आलं आहे. या प्रकरणी कागदपत्रांची तपासणी आणि कारवाई सुरू आहे.
Read also
- हेही वाचा..Good News : पिंपरी-चिंचवडकरांचा शास्तीकर पूर्ण माफीचा ‘जीआर’ अखेर आला !राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने ‘शब्द’ पाळला
- हेही वाचा..पहाटेच्या शपथविधीबाबत थोड्याच गोष्टी सांगितल्या, सगळ्या सांगतील तेव्हा… शिंदेंनी सभागृहात राजकीय बॉम्ब टाकला
- हेही वाचा..“भटक्या कुत्र्याचा त्रास, जिथं दिसेल, तिथून उचला अन् गुवाहाटीला नेऊन टाका,” राणें अन् बच्चू कडूंचा रोख नेमका कुणाकडे ?
- हेही वाचा..सत्यजीत तांबेंचं सभागृहात पहिलचं भाषण, थेट फडणवीसांनी घेतलेल्या निर्णयांवर ठेवलं बोट
- हेही वाचा.“संजय राऊत अन् आदित्य ठाकरेंची सुरक्षा काढून घ्या,” माजी खासदाराची फडणवीसांकडे मागणी