मुंबई : मराठा आरक्षणाचा कायदा सर्वोच्च न्यायालायने रद्द केल्यानंतर, नाराज आणि संतप्त मराठा समाजाने महामारी काळात पुन्हा मोर्चे आणि आंदोलने करण्याचा इशारा सरकारला दिला असून, विरोधकांकडून देखील सरकारवर सातत्याने टीका केली जात आहे.
दुसरीकडे, भाजपचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी देखील मराठा समाजाला न्याय आणि आरक्षणाचा हक्क मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला असून, २ दिवसांपासून ते या मुद्द्यावरून राज्याच्या दौऱ्यावर आहेत. यात त्यांनी मराठा समाजातील अनेक प्रमुखांची आरक्षणाविषयीची भूमिका जाणून घेतली आहे. तसेच, विविध संघटना आणि पक्षप्रमुखांची त्यांनी भेट घेतली असून, आज ते आपली भूमिका मांडणार आहेत.
दरम्यान, भूमिका मांडण्याआधी आज त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असून, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर त्यांच्याशी चर्चा करणार आहेत. तसेच, नंतर मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासावर जाऊन त्यांच्याशी देखील चर्चा करणार आहेत. यांनतर संध्याकाळी ते आपली भूमिका मांडणार आहेत, मात्र त्यांची भूमिका काय असेल, याकडे मराठा समाज आणि राजकीय नेत्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.
भाजपचे राष्ट्रपती नियुक्त खासदार असलेल्या छत्रपती संभाजीराजे यांनी, काही दिवसांपूर्वी गरज पडल्यास मी मराठा समाजासाठी खासदारकीचाही राजीनामा देईन, असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या होत्या. तसेच काल भाजपकडून देखील त्यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका करण्यात आली असून, त्यामुळे भाजप आणि छत्रपती संभाजीराजे यांच्यात यावरून सारं काही आलबेल नसल्याच्या चर्चा आहेत.
Read Also :
- अनाथांच्या मदतीला फडणवीस आले धावून; १०० बालकांचे पालकत्वं स्विकारलं
- नियुक्तीपत्रं कसं द्यायचं हे मला शिकवू नका, ५ वर्ष खातं संभाळलयं
- ‘पदोन्नतीमधील आरक्षणावर पाठिंबा काढण्याचा देणाऱ्या काँग्रेसला दारुबंदी हटवून गिफ्ट दिलंय’
- ‘…तिथे खाकीचा जोर दाखवा’, ‘त्या’ घटनेवरून चित्रा वाघ संतापल्या
- ‘आघाडीचे नेते सत्तेच्या नशेत, जनता मात्र हालात बेहोश’