मुंबई : अयोध्येतल्या राम मंदिरासाठी खरेदी केलेल्या जमिनीला घेऊन भ्रष्टाचार झाल्याचा आरोप, आपचे खासदार संजय सिंग यांनी केला असून, त्यामुळे आता वाद निर्माण झाला आहे. १० मिनिटांपूर्वी २ कोटींना खरेदी केलेली जमीन, श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने १८.५ कोटींना विकत घेतल्याचा कथित आरोप या आप खासदाराकडून करण्यात आला असून, सीबीआय आणि ईडीकडून चौकशी करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे.
हे पण वाचा, आगामी काळात भाजप आणि शिवसेना आमनेसामने उभे ठाकण्याची चिन्हे, अनिल परब म्हणतात…
दरम्यान, यावरून राज्यात राजकारण पेटले असून, शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांमध्ये यावरून शिवसेना भवनासमोर अभूतपूर्व असा राडा झाला. यामध्ये भाजपच्या काही महिला कार्यकर्त्यांना शिवसैनिकांनी मारहाण केल्याचा आरोप भाजपकडून केला गेला आहे. तसेच, यांनतर शिवसेना-भाजपच्या नेत्यांमध्ये यावरून वाक्युद्ध सुरु आहे. या राड्यावरून भाजपने शिवसेनेला ‘गुंडा पार्टी’ म्हणून हिणवले होते.
मा.संजय राऊतजी
हिंमत दाखवतं सामनात अग्रलेख लिहून सोनिया गांधी यांना वक्फ बोर्डाच्या जमिनी घोटाळ्यासंदर्भात सार्वजनिकरित्या खुलासा मागावा
अन्यथा आपला पुरूषार्थ फक्त एकट्या महिलेला मारहाण करण्यापुरताच आहे हे कबूल करावे pic.twitter.com/UPq7boKySX— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) June 18, 2021
यावर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी, ‘शिवसेना भवनावर कुणी चाल करून येत असेल, तर होय, आम्ही गुंड आहोत आणि आम्ही गुंड आहोत हे सांगण्यासाठी, आम्हाला कुणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही. महाराष्ट्राच्या, हिंदुत्वाच्या बाबतीत आम्ही सर्टिफाईड गुंड आहोत,’ असं विधान केलं आहे.
हे पण वाचा, मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्यास, त्याला शिवसेना जबाबदार असेल!
दरम्यान, यावर आता भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट करत सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. ‘अशीच हिंमत दाखवून सामन्यात अग्रलेख लिहून, सोनिया गांधी यांनी वक्फ बोर्डाच्या जमिनी घोटाळ्यासंदर्भात सार्वजनिकरित्या खुलासा मागावा. नाहीतर, आपला पुरूषार्थ फक्त एकट्या महिलेला मारहाण करण्यापुरताच आहे हे कबूल करावे,’ असं आव्हान दिलं आहे.
हे पण वाचा, ‘अशी दंडुकेशाही चालणार नाही’;भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा शिवसेनेला इशारा
तसेच, ‘सर्टिफाईड गुंड असो किंवा नॉन-सर्टिफाईड गुंड असो, त्यांच्याशी चार हात करायला महाराष्ट्रातील आम्ही जिजाऊंच्या लेकी तयार आहोत,’ असं म्हणत चित्रा वाघ यांनी संजय राऊत आणि शिवसेनेचा समाचार घेतला आहे.
Read Also :
- दोन चिल्लर पक्षांच्या छताखाली असलेला काँग्रेस, फुटकळ कामांची जाहिरातबाजी करतोय
- ‘आम्ही तेवढ्या एकाच कारणासाठी महाविकास आघाडीत सामील’- काँग्रेस
- ओबीसींचा इम्पिरिकल डेटा तयार केल्याशिवाय निवडणुका होऊ देणार नाही; पकजा मुंडे म्हणतात…
- अजित पवारांनी केली बीड जिल्ह्याच्या मुख्याधिकाऱ्यांची खरडपट्टी, म्हणाले…
- बीडने दाखवली उपमुख्यमंत्र्यांसमोर नाराजी; जमावाने अडवला ताफा, तर इसमाने घातला राडा