पुणे : अयोध्येतल्या राम मंदिरासाठी खरेदी केलेल्या जमिनीला घेऊन भ्रष्टाचार झाल्याचा आरोप, आपचे खासदार संजय सिंग यांनी केला असून, त्यामुळे आता वाद निर्माण झाला आहे. १० मिनिटांपूर्वी २ कोटींना खरेदी केलेली जमीन, श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने १८.५ कोटींना विकत घेतल्याचा कथित आरोप या आप खासदाराकडून करण्यात आला असून, सीबीआय आणि ईडीकडून चौकशी करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे.
हे पण वाचा, “आम्ही शिवसेनेचं अस्तित्व संपवल्याशिवाय राहणार नाही” – चंद्रशेखर बावनकुळे
दरम्यान, यावरून राज्यात राजकारण पेटले असून, शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांमध्ये यावरून शिवसेना भवनासमोर अभूतपूर्व असा राडा झाला. तसेच, यांनतर शिवसेना-भाजपच्या नेत्यांमध्ये यावरून वाक्युद्ध सुरु आहे. या राड्यावरून भाजपने शिवसेनेला ‘गुंडा पार्टी’ म्हणून हिणवले होते, त्याला प्रत्युत्तर देताना, शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी, ‘शिवसेना गुंडगिरी करते, पण आम्हाला सत्तेचा माज नाही,’ असा टोला भाजपाला लगावला होता.
हे पण वाचा, ‘शिवसेनेने जिथे हिंदुत्व सोडलं तिथंच तर अंतर निर्माण होण्यास सुरुवात झाली’
त्यानंतर आज, शिवसेनेचे प्रवक्ते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब पुण्यात आले होते, यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना, ‘शिवसेना भवनासमोर जो राडा झाला, त्याचे भाजपला जशास तसे उत्तर देऊ,’ असा इशारा दिला आहे. त्यामुळे पुन्हा भाजप आणि शिवसेना कार्यकर्ते भिडण्याची चिन्हे दिसत आहेत.
हे पण वाचा, ‘कुठे बाळासाहेबांची शिवसेना, कुठे सत्तेपाई सत्व गमावलेली ही शिवसेना’
दरम्यान, काल संजय राऊत यांनी, ‘शिवसेना भवनावर चाल करून आल्यास, जशास तसे उत्तर देऊ. गुंडगिरी म्हणत असताल, तर मराठी माणसाच्या अस्मितेचं प्रतिक असलेल्या, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी, ज्या वास्तूमध्ये बसून राज्याचा कारभार हाकला, त्या शिवसेना भवनावर कुणी चाल करून येत असेल, तर होय, आम्ही गुंड आहोत आणि आम्ही गुंड आहोत हे सांगण्यासाठी, आम्हाला कुणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही. महाराष्ट्राच्या, हिंदुत्वाच्या बाबतीत आम्ही सर्टिफाईड गुंड आहोत,’ असं विधान केलं आहे.
Read Also :
- मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्यास, त्याला शिवसेना जबाबदार असेल!
- ‘अशी दंडुकेशाही चालणार नाही’;भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा शिवसेनेला इशारा
- ‘तो दिवस लांब नाही ज्या दिवशी शिवसेना भवनच्या काचा फुटलेल्या दिसतील’
- ‘तुम्हाला भंडाऱ्यात बसवण्याची व्यवस्था करू’, दरेकरांचे राऊतांना जोरदार प्रत्युत्तर
- भाजप-शिवसेना वाद : किशोरी पेडणेकरांकडून बाळासाहेबांचा व्हिडीओ ट्वीट, व्हिडीओत बाळासाहेब म्हणत आहेत…