बंगळुरू : बेळगाव महापालिकेचा निवडणूक निकाल आज जाहीर होत असून मतमोजणीमध्ये भाजपाने महाराष्ट्र एकीकरण समितीची धुळधाण उडविली आहे. बेळगाव (शहर) म्हणजे महाराष्ट्र एकीकरण समिती असे समीकरण आमदारकीनंतर आता महापालिकेतही यावेळी बदलताना दिसत आहे. मतमोजणी दिवशी शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी 30 जागा जिंकण्याचा दावा केला होता. आज त्यांचा स्वप्नभंग झाला आहे. त्यातच आता महाराष्ट्रातील महापालिका निवडणुका अवघ्या काही महिन्यावर येवून ठेपल्या आहेत. त्यामुळे, महाविकास आघाडी सरकारला राज्यातील महापालिका निवडणुकीत मोठा फटका बसणार असल्याचे बोलले जात आहे.
“राजकारण आपलं पण जीव जातो जनतेचा”, मुख्यमंत्र्यांनी मनसे-भाजपला सुनावले
संजय राऊत यांनी या निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण आणि इतर आमचे मराठी संघटना मिळून 30 च्या आसपास जागा जिंकू. बेळगाववर मराठी माणसाचीच सत्ता आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध होईल, असा विश्वास व्यक्त केला होता. मात्र, आज दुपारी 12.30 वाजेपर्यंत हाती आलेले निकाल पाहता मए समितीच्या पारड्यात अद्याप दोनच जागा आल्याने भाजपाच्या ताब्यात महापालिका जाण्याची मोठी शक्यता निर्माण झाली आहे.
करुणा शर्मा पोलिसांच्या ताब्यात, पिस्तूल प्रकरणी देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रीया… काय म्हणाले…
कर्नाटक लोकसभा पोटनिवडणुकीत म.ए. समितीचे शुभम शेळके हा तरुण उभा राहिला होता. त्याला लाखावर मते पडली होती. एकजूट चांगली होत आहे. या निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समिती आणि इतर सर्व मिळून आम्ही 30 च्या आसपास जागा जिंकू, असा विश्वास राऊत यांना होता. तसेच आम्ही प्रचाराला गेलो तर एकीकरण समितीवर कर्नाटक सरकारचा दहशतवाद होईल म्हणून इथूनच मदत करत असल्याचे म्हटले होते.
पोलिसांनी उधळला धनंजय मुंडेंच्या घातपाताचा डाव; करूणा शर्मा बंदुकीसह पोलिसांच्या ताब्यात
यावेळी महानगरपालिका निवडणूक सर्वप्रथम पक्षीय तिकिटावर झाली. महाराष्ट्र एकीकरण समिती विरुद्ध काँग्रेस विरुद्ध भाजप आणि इतर पक्ष अशा पद्धतीने झालेल्या निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांचा धक्कादायक रित्या पराभव होत असल्याचे दिसून येत आहे. ज्यांच्या विजयाची शक्यता शंभर टक्के होती असे मराठी आणि समितीचे उमेदवार निवडणुकीत एका मागोमाग एक पराभूत होत असल्यामुळे भाजपची एकहाती विजयाकडे वाटचाल नक्की झाली आहे.
महाराष्ट्र एकीकरण समिती : 2
भाजप : 36
काँग्रेस : 09
अपक्ष : 10
एमआयएम : 1
Read Also :
- करुणा शर्मा यांना अडकवण्यासाठी रचले गेले षडयंत्र? नवी माहिती समोर
- चित्रा वाघ-मेहबूब शेख यांच्यात रंगले सोशल मीडियावर जोरदार शाब्दिक युद्ध
- संजय राऊत तोंडघशी पडले, बेळगांव महानगरपालिकेवर भाजपची मुसंडी, स्पष्ट बहुमत
- शरद पवार यांना तात्काळ अटक करा, अन्यथा आम्ही उच्च न्यायालयात जाऊ – गुणरत्न सदावर्ते
- वसंतदादा पाटीलांचा विश्वासघात करून पवारसाहेब आघाडीतून कसे बाहेर पडले? -भाजप