पुणे : कसबा पोटनिवडणूक मतदारसंघात कुंभारवाडा, शिंपी आळी, भाई वाडा, पवळे चौक, गावकोस मारुती परिसर या पूर्वेकडील भागात अपेक्षेप्रमाणे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना पहिल्या फेरीत आघाडी मिळाली आहे. पहिल्या फेरीत ज्या १४ मतदान केंद्रावरील मतांची मोजणी झाली तो संपूर्ण भाग काँग्रेसला पाठिंबा देणारा आहे. त्यामुळे या भागात अपेक्षेप्रमाणे काँग्रेसला आघाडी मिळाली आहे.
हेही वाचा..“अयोध्यावरून ‘धनुष्यबाण’ आणून राज्यभर फिरवणार, शिंदेंची राज्यात ‘शिवधनुष्य’ यात्रा
कसब्यात नवव्या फेरीतील हा भाग आहे जिथे २०१९ विधानसभा निवडणुकीत मुक्ता टिळक यांना २१, ००० मताधिक्य मिळालं होतं. त्यातच आता नवव्या फेरीअखेर काॅंग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांची आघाडी कायम ठेवली असून त्यांना ३४ हजार ७४१ मत मिळाली आहेत. तर अपक्ष उमेदवार अभिजित बिचुकलेंनीही उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांना ४ मतं मिळाली असून हिंदू महासेभेचे आनंद दवे यांना १२ मतं मिळाली आहेत.
हेही वाचा..“श्रीराम सेना हिंदुस्थान संस्था, पोलीस मित्र संघटना, आज कोण कोणी ठाकरे गटात प्रवेश केला ?
या निवडणुकीत आश्चर्यकारक निकाल लागणार आहे. मी पोस्टल मतांमध्ये कायम आघाडीवर राहतो. आता शेवटच्या फेरीपर्यंत माझी अशीच आघाडी राहणार. माझं लीड २ हजार मतांच्या पुढे जाईल. मतांची कोणतीही विभागणी होणार नाही. मी पोस्टलमध्ये आघाडीवर आलो म्हणचे विषयच संपला. असं रविंद्र धंगेकरांनी म्हटलं आहे.
तिसरी फेरी
रवींद्र धंगेकर ११,१५७
हेमंत रासने १०,६७३
आनंद दवे १२
चौथी फेरी!
रवींद्र धंगेकर १४८९१
हेमंत रासने १४३८२
आनंद दवे १००
पाचवी फेरी
रवींद्र धंगेकर १९०२०
हेमंत रासने १७०५३
आनंद दवे १००
सातवी फेरी
रवींद्र धंगेकर २५,९०४
हेमंत रासने २४,६३३
आनंद दवे १००
आठवी फेरी
रवींद्र धंगेकर ३०,५३७
हेमंत रासने २७,१८७
आनंद दवे १००
नववी फेरी
रवींद्र धंगेकर ३४,७७८
हेमंत रासने ३०,२७२
आनंद दवे १००
दहावी फेरी
रवींद्र धंगेकर ३८,२६३
हेमंत रासने ३४,०३६
आनंद दवे १००
Read also
- हेही वाचा..“कसब्यात ‘रविंद्र धंगेकर’ तर चिंचवडमध्ये ‘अश्विनी जगताप’ आघाडीवर”, पोटनिवडणुकांचा कल हाती
- हेही वाचा..““कसब्यात ‘रविंद्र धंगेकर’ तर चिंचवडमध्ये ‘अश्विनी जगताप’ आघाडीवर”, पोटनिवडणुकांचा कल हाती
- हेही वाचा..“गुरूवारी कोर्टात ठाकरेंना शिंदेंकडून वकिल धक्का देणार, महेश जेठमलानी मनिंदर सिंग यांचा युक्तिवाद गेम चेंजर ठरणार
- हेही वाचा..राऊतांच्या विरोधात हक्कभंगाची समिती, भाजपसह, काॅंग्रेस, राष्ट्रवादीच्या आमदारांचा समावेश, ४८ तासांची मुदत
- हेही वाचा..तर संजय राऊतांना कारावासाची शिक्षा होऊ शकते, राऊतांच्या वक्तव्यावर वकील ‘असीम सरोदे’ यांचं सुचक विधान