मुंबई : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्यावर लिलीवती रूग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचे एमआरआय काढताना काही फोटो व्हायरल झालेत यावरून मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आणि शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी रूग्णालयात ठिय्या घातला. नवनीत राणा यांच्यावर उपचार होत असताना फोटो का काढले, असा सवाल करीत त्यांनी लिलावती रूग्णालयातील डॉक्टरांना सुनावलं. आता यावरून भाजप नेते निलेश राणे यांनी शिवसेनेवर टिका केली आहे.
संजय राऊत यांचे ‘टॉयलेट’ घोटाळा प्रकरण; किरीट सोमय्या यांच्या पत्नीची अब्रुनुकसानीची तक्रार
लीलावती हॉस्पिटलमध्ये शिवसेनेची भारतीय कामगार सेना युनियन आहे, मागच्या ३ वर्षापासून कर्मचारी युनियनशी जोडलेले आहेत, सातत्याने कराराबद्दल तक्रारी व मॅनेजमेंट सोबत मिटिंग करावी यासाठी नेत्यांकडे ३ वर्ष विनंती करतायत. अखेर सेनेची मंडळी आली पण कर्मचार्यांसाठी नाही तर नवनीत राणांसाठी. अशी खोचक टिप्पणी त्यांनी केली आहे.
संजय राऊतांचा किरीट सोमय्यांवर नवा आरोप; म्हणाले, किरीट का कमाल.. आप क्रोनोलॉजी समजीए!
ज्यावेळी नवनीत राणा यांना एमआरआय मशिन मध्ये टाकण्यात आले. त्यावेळी फोटो काढले गेले असल्याचं डॉक्टरांनी सांगितले. मात्र ज्यावेळी दरवाजा बंद केला जातो तेव्हाच मशिन काम करते, असं म्हणत किशोरी पेडणेकर डॉक्टरांवर चिडल्या. त्यावेळी त्यांनी सीसीटिव्ही कॅमेऱ्याचं फुटेज दाखवण्याची मागणी केली. तसेच जोपर्यंत नवनीत राणा यांचं मेडिकल रिपोर्ट मिळत नाही. तोपर्यंत आम्ही याचठिकाणी बसणार. अशी भूमिका देखील त्यांनी घेतली आहे.

Read also:
- “अध्यात्म आणि धर्मामध्ये कुणाचीही स्पर्धा नसते”; रोहित पवारांनी सांगितलं अयोध्या दौऱ्याचं कारण
- “त्यांच्या पाठीवर दांडके मारवे लागतील, तरच ते विकासाची सत्य भाषा बोलू लागतील”; खोतांचा आघाडीवर घणाघात
- सदावर्तेंचं थेट शरद पवारांना आव्हान ! निवडणुकीच्या रिंगणात उतरताच नव्या संघटनेची घोषणा
- मोठी बातमी: राणा दाम्पत्याला मुंबई सत्र न्यायालयाची नोटीस; जामीन रद्द होणार?
- राणांच्या एमआरआयच्या फोटोवरून सेनेचा रूग्णालयात राडा; किशोरी पेडणेकर, कायंदेंचा लीलावतीमध्ये ठिय्या