मुंबई : राजद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांची सुटका करण्यात आली. तब्बल १४ दिवस तुरूंगात राहिल्याने त्या अनेक व्याधींनी त्रस्त झाल्या होत्या. त्यानंतर त्यांनी लगेचच मुंबईतील लीलावती रूग्णालयात दाखल होऊन उपचार घेतले. मात्र यावेळी त्यांचे एमआरआय काढतानाचे फोटो व्हायरल झाले. त्यावर एमआरआय काढण्याची रूग्णालयात परवानगी कुणी दिली ? असा सवाल करत शिवसेनेने रूग्णालयात राडा घातला.
“वसंत, तु मिसळ महोत्सव घे, मी येतो”; राज ठाकरेंनी वसंत मोरेंना दिला शब्द
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आणि शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी रूग्णालयात ठिय्या घातला. नवनीत राणा यांच्यावर उपचार होत असताना फोटो का काढले, असा सवाल करीत त्यांनी लिलावती रूग्णालयातील डॉक्टरांना सुनावलं. तसेच जो पर्यंत नवनीत राणा यांचे मेटिकल रिपोर्ट मिळत नाही. तो पर्यंत आम्ही जाणार नाही, अशी ताकीद देखील त्यांनी डॉक्टरांना दिली. यावेळी रूग्णालयात मोठा गोंधळ निर्माण झाला होता.
“राज्य आता पवारांपासून वाचवण्याची वेळ आलीय”; सदाभाऊ खोतांची राष्ट्रवादीवर जोरदार टिका
ज्यावेळी नवनीत राणा यांना एमआरआय मशिन मध्ये टाकण्यात आले. त्यावेळी फोटो काढले गेले असल्याचं डॉक्टरांनी सांगितले. मात्र ज्यावेळी दरवाजा बंद केला जातो तेव्हाच मशिन काम करते, असं म्हणत किशोरी पेडणेकर डॉक्टरांवर चिडल्या. त्यावेळी त्यांनी सीसीटिव्ही कॅमेऱ्याचं फुटेज दाखवण्याची मागणी केली. तसेच जोपर्यंत नवनीत राणा यांचं मेडिकल रिपोर्ट मिळत नाही. तोपर्यंत आम्ही याचठिकाणी बसणार. अशी भूमिका देखील त्यांनी घेतली आहे.
“मोदींनी सात वर्षापुर्वी एक स्वप्न पाहिलं होेतं, ते पुर्ण होतंय”; फडणवीसांनी मोकळ्य़ा केल्या भावना
दरम्यान, लिलावती रूग्णालयातून बाहेर पडताच नवनीत राणांनी पत्रकार परिषदमध्ये राज्य सरकारवर जोरदार टिका केली. माझ्यावर जे काही झालं आहे. ते मुख्यमंत्र्यांनी गुंडांनी केलं आहे. याप्रकरणाबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रकरणाची माहिती घ्यावी आणि मला न्याय मिळून द्यावा, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. तसेच झालेल्या सर्व प्रकरणाबाबत त्या आज दिल्लीत गृहमंत्री आणि लोकसभा अध्यक्षांची भेट घेणार आहेत.
Read also:
- संजय राऊत यांचे ‘टॉयलेट’ घोटाळा प्रकरण; किरीट सोमय्या यांच्या पत्नीची अब्रुनुकसानीची तक्रार
- संजय राऊतांचा किरीट सोमय्यांवर नवा आरोप; म्हणाले, किरीट का कमाल.. आप क्रोनोलॉजी समजीए!
- NIA ने दाऊदच्या हस्तकांच्या मुसक्या आवळल्या; अन् सरकार हनुमान चालीसा म्हणणाऱ्यांना अटक करण्यात व्यस्त
- नवनीत राणा दिल्लीकडे रवाना; केंद्रीय गृहमंत्री, लोकसभा अध्यक्षांची भेट घेऊन तक्रार दाखल करणार
- तो पोपटासारखा बोलतो, त्याला कोश्यारी असेपर्यंत विधान परिषद देऊ नका? बापटांची शरद पवारांसमोर फटकेबाजी