मुंबई- सशर्त जामिनावर तुरुंगातून बाहेर आलेल्या अपक्ष खासदार नवनीत राणा आणि अपक्ष आमदार रवी राणा यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. न्यायालयाने राणा दाम्पत्याला जामीन देताना काही अटी-शर्ती घालून दिल्या होत्या. मात्र, या अटींचे उल्लंघन झाल्याचा दावा करत सरकारी पक्षाने न्यायालयात धाव घेतली होती. सरकारी वकील प्रदीप घरत यांनी ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर सत्र न्यायालयाने राणा दाम्पत्याला नोटीस पाठवली आहे. आम्ही तुमचा जामीन रद्द का करू नये, असे स्पष्टीकरण राणा दाम्पत्याकडून मागवण्यात आले आहे. यावर आता राणा दाम्पत्याकडून काय भूमिका मांडली जाते, हे पाहावे लागेल.
“ओबीसी आरक्षणाचा राज्यात नव्हे तर देशात भाजप सरकारने खुन केला”; छगन भुजबळ भाजपवर कडाडले
राणा दाम्पत्यांना सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर नवनीत कौर राणा यांना मानदुखीचा त्रास झाला होता. त्यामुळे त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रविवारी 11 वाजेदरम्यान नवनीत राणा यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला होता. राणांनी यादरम्यान काही वक्तव्ये केली होती. प्रसारमाध्यमांशी बोलू नका, अशी अट जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन मंजूर होताना घातली होती. मात्र, काल प्रसारमाध्यमांशी संवाद साधून त्यांनी कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याने त्यांना ही नोटीस पाठवण्यात आली आहे.
“बबली मोठी झाली नाही, बबली अजून नासमज”; पेडणेकरांची नवनीत राणांवर मिश्किल टिप्पणी
राणा दाम्पत्याचे जामीन रद्द करण्याबाबत अद्याप कोणतेही आदेश न्यायालयाने दिलेले नाही. त्यामुळे हा मोठा दिलासा राणा दाम्पत्याला म्हणावे लागेल. पंरतु राज्य सरकारने न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, नवनीत राणांनी रुग्णालयातून बाहेर येताच राज्य सरकार आणि हनुमान चालिसावर वक्तव्य केले आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना देखील राणांनी निवडणूक लढण्याचे आव्हान दिले आहे. त्यामुळे राणा यांनी कायदा मोडल्याची याचिका राज्य सरकारकडून दाखल करण्यात आली आहे. कोर्टाने जामीन मंजूर करताना म्हटले होते की, जर एकाही अटीचे उल्लंघन झाले तर जामीन रद्द केला जाऊ शकतो. मात्र, सद्या कोर्टाने केवळ राणा दाम्पत्याला आपली भूमिका स्पष्ट करण्याची नोटीस पाठवली आहे. त्यावर सुनावणी नेमकी कधी होईल याची माहिती कोर्टाने दिलेली नाही.
“मोदींनी सात वर्षापुर्वी एक स्वप्न पाहिलं होेतं, ते पुर्ण होतंय”; फडणवीसांनी मोकळ्य़ा केल्या भावना
दरम्यान, न्यायालयाने नोटीस बजावल्यानंतर राणा दाम्पत्यानी आपली प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही कोणत्याही प्रकारचे उल्लंघन केलेले नाही, टीकेला उत्तर देणे हा आमचा घटनात्मक अधिकार आहे. आम्ही वकीलांशी चर्चा केली आहे. आम्ही आमचा जबाब न्यायालायात दाखल करणार आणि आम्हाला पुन्हा न्यायालय न्याय देईल, अशी प्रतिक्रिया रवि राणांनी दिली आहे.
Read also:
- राणांच्या एमआरआयच्या फोटोवरून सेनेचा रूग्णालयात राडा; किशोरी पेडणेकर, कायंदेंचा लीलावतीमध्ये ठिय्या
- संजय राऊत यांचे ‘टॉयलेट’ घोटाळा प्रकरण; किरीट सोमय्या यांच्या पत्नीची अब्रुनुकसानीची तक्रार
- संजय राऊतांचा किरीट सोमय्यांवर नवा आरोप; म्हणाले, किरीट का कमाल.. आप क्रोनोलॉजी समजीए!
- NIA ने दाऊदच्या हस्तकांच्या मुसक्या आवळल्या; अन् सरकार हनुमान चालीसा म्हणणाऱ्यांना अटक करण्यात व्यस्त
- नवनीत राणा दिल्लीकडे रवाना; केंद्रीय गृहमंत्री, लोकसभा अध्यक्षांची भेट घेऊन तक्रार दाखल करणार