नाशिक : शेतकरी आत्महत्या ह्या राज्यानं फार पाहिल्या पण शेतकऱ्याचा आसूड अजून पाहिला नाही. हा आसूड बेजबाबदार सरकारी धोरणांवर ओढत, रयत क्रांती संघटनेच्या यशस्वी कोकण दौऱ्यानंतर झंझावाती दुसरा टप्पा धडकणार थेट खान्देश, विदर्भ, मराठवाडा, आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये धडकला आहे. जागर शेतकऱ्यांचा आक्रोश महाराष्ट्राचा राज्यव्यापी दौऱ्याच्या वेळी रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी नाशिकमध्ये राज्य सरकारवर जोरदार टिका केली.
ज्या पद्धतीने संत ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या पाठीवर हात ठेवताच रेडा वेद बोलू लागला. तसेच महाविकास आघाडीच्या ह्या रेड्यांच्या तोंडून सत्य वदवण्यासाठी त्यांच्या पाठीवर दांडके घेऊन फटके मारले तरच ते विकासाची सत्य भाषा बोलू लागतील असा घणाघात सदाभाऊ खोत यांनी महाविकास आघाडी सरकारला लावला आहे.
नवनीत राणा दिल्लीकडे रवाना; केंद्रीय गृहमंत्री, लोकसभा अध्यक्षांची भेट घेऊन तक्रार दाखल करणार
महाराष्ट्राचे वाटोळे सध्या पवार आणि पवार कंपनीने केले आहे. या राज्यास आता पवारांपासून वाचवण्याची वेळ येऊन ठेपली आहे. त्यासाठी राज्यातील सरकार सध्या बारामती वरून चालतं. असा घणाघात देखील त्यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केला आहे. जागर शेतकऱ्यांचा आक्रोश महाराष्ट्र अभियान आम्ही सुरू केलं आहे. त्यात आम्ही राज्यव्यापी दौरा करणार आहोत. तसेच या सरकारविरोधात जोरदार आंदोलन उभं करू, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.
तो पोपटासारखा बोलतो, त्याला कोश्यारी असेपर्यंत विधान परिषद देऊ नका? बापटांची शरद पवारांसमोर फटकेबाजी
दरम्यान, शिवसेनेची सत्ता आल्यानंतर प्रत्येक शेतकऱ्याचे दहा हजार भरणार हे आश्वासन देण्यात आले होते. दहा हजार सोडा शेतकऱ्यांची वीज सरकार कापू लागले आहेत. दुसरीकडे आमची सत्ता आल्यानंतर आम्ही वीज मोफत देऊ असे अजित पवार यांनी सांगितलं होतं. परंतु त्याचे पुढे काय झाले? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. पीक विमा कर्ज, नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रूपये अद्याप दिलेले नाहीत. ही शोकांतिका म्हणावी लागेल, असंही ते म्हणाले.
Read also:
- सदावर्तेंचं थेट शरद पवारांना आव्हान ! निवडणुकीच्या रिंगणात उतरताच नव्या संघटनेची घोषणा
- मोठी बातमी: राणा दाम्पत्याला मुंबई सत्र न्यायालयाची नोटीस; जामीन रद्द होणार?
- राणांच्या एमआरआयच्या फोटोवरून सेनेचा रूग्णालयात राडा; किशोरी पेडणेकर, कायंदेंचा लीलावतीमध्ये ठिय्या
- संजय राऊत यांचे ‘टॉयलेट’ घोटाळा प्रकरण; किरीट सोमय्या यांच्या पत्नीची अब्रुनुकसानीची तक्रार
- संजय राऊतांचा किरीट सोमय्यांवर नवा आरोप; म्हणाले, किरीट का कमाल.. आप क्रोनोलॉजी समजीए!