पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा 5 जुन रोजी आयोध्याचा दौरा आहे. तर शिवसेनेकडून आदित्य ठाकरे देखील येत्या 10 जूनला म्हणजे राज ठाकरे यांच्या दौऱ्यानंतर जाणार आहे. त्याआधीच राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी अलिकडेच सहपरिवारासंह अयोध्या दौरा केला. तसेच त्यांनी गंगा नदीवरील आरतीच्या कार्यक्रमात देखील सहभाग घेतला. यावरून त्यांना राज्यातील राजकीय नेते टोमणे मारत आहेत. त्यावर आता रोहित पवारांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
संजय राऊतांचा किरीट सोमय्यांवर नवा आरोप; म्हणाले, किरीट का कमाल.. आप क्रोनोलॉजी समजीए!
रोहित पवार म्हणाले की, अध्यात्म आणि धर्मामध्ये कुणाचीही स्पर्धा नसते. तुम्ही कधीही संतपिठाला जाऊन दर्शन घेऊ शकता. यामध्ये जर स्पर्धा होत असले तर ते मला योग्य वाटत नाही. परंतु आज त्या ठिकाणी एक वेगळ्याप्रकारे वातावरण निर्माण करून राजकीय दृष्टीकोनातून जो काही राजकीय बाजार मांडण्याचा प्रयत्न केला जात आहे. तो योग्य नाही.
माझी आईवडिलांनी देखील याआधी पुजा केली आहे. एव्हाना जर एखादी घरात नवीन गाडी आणली तर त्याची देखील पुजा केली आहे. मागे काही दिवसापासून माझ्या आईचे वडिलांचं निधन झालं. त्यामुळे माझ्या आईच्या मनात तिर्थयात्रासंबंधी मनात होतं आणि मलापण जायचं होतं. त्यानंतर आम्ही एकत्रित निर्णय घेतला आणि गेलो. असंही ते म्हणाले.
नवनीत राणा दिल्लीकडे रवाना; केंद्रीय गृहमंत्री, लोकसभा अध्यक्षांची भेट घेऊन तक्रार दाखल करणार
दरम्यान, राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याच्या घोषणेनंतर शिवसेनेने देखील अयोध्या दौऱ्याबाबत भाष्य केलं. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे येत्या 10 तारखेला अयोध्याला जाणार असल्याचं शिवसेना खासदार संजय राऊतांनी स्पष्ट केलं. पंरतु त्याआधीच राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार रोहित पवारांनी अयोध्या दौरा केला. त्यामुळे राज्यातील राजकारण्यांना हिंदुत्वाचा वायरस चढला की काय ? असा प्रश्न पडला होता.
Read also:
- “त्यांच्या पाठीवर दांडके मारवे लागतील, तरच ते विकासाची सत्य भाषा बोलू लागतील”; खोतांचा आघाडीवर घणाघात
- सदावर्तेंचं थेट शरद पवारांना आव्हान ! निवडणुकीच्या रिंगणात उतरताच नव्या संघटनेची घोषणा
- मोठी बातमी: राणा दाम्पत्याला मुंबई सत्र न्यायालयाची नोटीस; जामीन रद्द होणार?
- राणांच्या एमआरआयच्या फोटोवरून सेनेचा रूग्णालयात राडा; किशोरी पेडणेकर, कायंदेंचा लीलावतीमध्ये ठिय्या
- संजय राऊत यांचे ‘टॉयलेट’ घोटाळा प्रकरण; किरीट सोमय्या यांच्या पत्नीची अब्रुनुकसानीची तक्रार