मुंबई : गेल्या काही दिवसांमध्ये वाढलेली करोनारुग्ण संख्या आता कमी होताना दिसत आहे. मुंबईतील करोरारुग्णांची संख्या कमी होऊ लागली आहे. प्रशासनाकडून लसीकरणावर भर दिला जात आहे. मात्र लसींअभावी कमी प्रमाणात लसीकरण होत आहे. याच पार्श्वभूमीवर आता मुंबईत पुरेशी लस उपलब्ध व्हावी या दृष्टीने परदेशातून लस खरेदी करण्याचा विचार सुरू आहे.
मुंबईमध्ये कोरोना प्रतिबंधक लसींची पुरेशी उपलब्धता होण्याच्या दृष्टीने या लसींची जागतिक पातळीवरून खरेदी करण्याच्या अनुषंगाने शक्यता पडताळून पाहण्याच्या सूचना मुंबई महापालिकेला मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.
शहरातील लसीकरण वेगाने आणि परिणामकारक होण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमवेत यासंदर्भात चर्चा केल्यानंतर महापालिकेला सूचना देण्यात आल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. तसेच, जे कोविन अॅप वापरू शकत नाही, अशा नागरिकांसाठी वेगळी पद्धत तयार करावी, असेही आदित्य ठाकरेंनी सांगितले.
शहरातील प्रत्येक पालिका झोनमध्ये एक ड्राईव्ह-इन लसीकरण केंद्र सुरु केल्याने आता शहरात लसीकरण केंद्रांची संख्या वाढली आहे. शिवाय ड्राईव्ह-इन लसीकरण मोहीमेमुळे ज्येष्ठ नागरिकांना लस सुलभरित्या मिळण्यासाठी मदत होत असल्याचेही ते म्हणाले. राज्यातील इतर शहांनी देखील ड्राईव्ह-इन लसीकरण केंद्र लसीकरण मोहिम सुरू करण्याचे आवाहन त्यांनी केले.
Read Also :
- ‘मुंबईप्रमाणे पुण्यातही जेष्ठ, दिव्यांग नागरिकांसाठी ड्राईव्ह ईन पध्दतीने लसीकरण करावे’
- ‘70 हजार कोटींच्या ठेवी असलेल्या मुंबई महापालिके मोफत लसीचा बोजा उचलावा’
- ‘पत्रकारांना फ्रंटलाईन वर्कर्सचा दर्जा देऊन लसीकरण करावे’
- म्युकरमायकोसीसच्या रुग्णांवर होणार मोफत उपचार, राजेश टोपेंची मोठी घोषणा
- “भाजपमध्ये ओबीसी नेत्यांना डावललं जातंय, मुंडेंचा झाला सर्वाधिक छळ”, खडसेंचा गंभीर आरोप