पुणे : मुंबईतील ड्राईव्ह ईन पद्धतीने करण्यात येत असलेल्या लसीकरण पद्धतीची चर्चा होत आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईतील दादर येथे कोहिनूर स्क्वेअर पार्किंगमध्ये ड्राईव्ह ईन पद्धतीने लसीकरणाची सुरुवात करण्यात आली होती. आता याच धर्तीवर पुण्यात देखील ड्राईव्ह ईन पद्धतीने लसीकरण केले जावे, अशी सूचना शिवसेना नेत्या आणि उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुणे प्रशासनास दिली आहे.
पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने कमी होत आहे. या परिस्थितीत महानगरपालिकेने लसीकरण करत आहे, त्याबाबत नीलम गोऱ्हे यांनी प्रशासनाचे कौतुक केले.
पुण्यात सर्वात जास्त ज्येष्ठ नागरिक राहतात, असे सर्वेक्षणातून दिसून आले आहे. मुंबईच्या धर्तीवर पुणे महानगरपालिकेने ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी वाहनांमध्येच ड्राईव्ह ईन लसीकरण करण्याची सुविधा नागरिकांना उपलब्ध करून द्यावी, अशी सूचना गोऱ्हे यांनी प्रशासनाला दिली आहे.
पुण्याच्या लोकसंख्येचा विचार करता ८ विधानसभा क्षेत्रात प्रत्येकी ३ याप्रमाणे एकूण २४ ड्राईव्ह इन लसीकरण सेंटर असावेत असे देखील त्यांनी प्रशासनाला सुचवले.
Read Also :
- ‘70 हजार कोटींच्या ठेवी असलेल्या मुंबई महापालिके मोफत लसीचा बोजा उचलावा’
- ‘पत्रकारांना फ्रंटलाईन वर्कर्सचा दर्जा देऊन लसीकरण करावे’
- म्युकरमायकोसीसच्या रुग्णांवर होणार मोफत उपचार, राजेश टोपेंची मोठी घोषणा
- “भाजपमध्ये ओबीसी नेत्यांना डावललं जातंय, मुंडेंचा झाला सर्वाधिक छळ”, खडसेंचा गंभीर आरोप
- “परदेशातून काय आलं हे मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांनाच विचारा”, जयंत पाटलांच्या टीकेला दरेकरांचे प्रत्युत्तर