मुंबई : मुंबईतील 18 ते 44 वयोगटातील सर्व नागरिकांना मोफत लस द्यावी, अशी मागणी भाजपने केली आहे. यासंदर्भात मुंबई भाजपाच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्याकडे एका निवेदनाद्वारे मागणी केली.
मुंबई महानगरपालिकेकडे सुमारे ७० हजार कोटींच्या ठेवी असल्यामुळे महापालिका मोफत लशींचा बोजा सहज उचलू शकते. केंद्र सरकारच्या धोरणानुसार खाजगी रुग्णालये व राज्य सरकार आता लसीच्या ५० टक्के उत्पादनाची थेट खरेदी करू शकते. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने राज्य सरकारच्या माध्यमातून लशींची खरेदी करून मोफत लसीकरणाला ताबडतोब सुरुवात करावी, असे या पत्रात म्हटले आहे.
मुंबईतील १८ ते ४४ वयोगटातील सर्व नागरिकांना मोफत लस द्यावी अशी मागणी मुंबई भाजपाच्या शिष्टमंडळाने आज महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली.
सुमारे ७० हजार कोटीच्या ठेवी असल्यामुळे मोफत लसीचा बोजा महापालिकेला सहज उचलू शकते असे आम्ही सांगितले. pic.twitter.com/FSSqpipO2z— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) May 10, 2021
2021 च्या जनगणनेनुसार, मुंबईत 18 ते 44 वयोगटातले सुमारे 58 लाख 50 हजार नागरिक आहेत. दोन डोसचे 600 रुपये याप्रमाणे हा खर्च साधारण 350 कोटी रुपये येतो. मुंबई महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती पाहता पालिका हा खर्च उचलू शकते. त्यामुळे हा निर्णय त्वरित करून लस निर्मिती कंपन्यांना खरेदीचे पैसे द्यावेत, अशी मागणी भाजपने केली आहे.
मुंबई भाजपा अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, विरोधी पक्षनेते विधान परिषद प्रवीण दरेकर, भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर, आमदार आशीष शेलार आदि नेत्यांच्या उपस्थितीत पालिका आयुक्तांची भेट घेऊन हे निवेदन देण्यात आले.
Read Also :
- ‘पत्रकारांना फ्रंटलाईन वर्कर्सचा दर्जा देऊन लसीकरण करावे’
- म्युकरमायकोसीसच्या रुग्णांवर होणार मोफत उपचार, राजेश टोपेंची मोठी घोषणा
- “भाजपमध्ये ओबीसी नेत्यांना डावललं जातंय, मुंडेंचा झाला सर्वाधिक छळ”, खडसेंचा गंभीर आरोप
- “परदेशातून काय आलं हे मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांनाच विचारा”, जयंत पाटलांच्या टीकेला दरेकरांचे प्रत्युत्तर
- काँग्रेसने केले मान्य, नरेंद्र मोदींनी देशाला दिल्या “या” तीन गोष्टी