बीड : सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचा व त्यांच्या कुटुंबीयांच्या घातपाताचा कट आखल्याप्रकरणी आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी परळी पोलिसांनी रविवारी, करूणा शर्मा या महिलेला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. तिच्या गाडीतून पोलिसांनी पिस्तूल जप्त केले होते. त्यामुळे, परळीसह राज्यात मोठी खळबळ उडाली होती. दरम्यान, या प्रकरणी आता मोठी घडामोड घडत असून, करुणा शर्मा यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
पोलिसांनी उधळला धनंजय मुंडेंच्या घातपाताचा डाव; करूणा शर्मा बंदुकीसह पोलिसांच्या ताब्यात
करूणा शर्मा यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमांतून धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप करत, वैद्यनाथ मंदिरात दर्शन घेणार असून, त्यांनतर पत्रकार परिषद घेणार व धंनजय मुंडेंच्या घरी जाणार असे सांगितले होते. त्यासाठी परळीत आल्या असता, मंदिर परिसरात दर्शनासाठी आलेल्या महिलांशी त्यांनी वाद घातला आणि त्यांच्याशी झालेल्या बाचाबाचीत करूणा यांनी जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप करत एका महिलेने त्यांच्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल केला. पोलिसांना त्यांच्या गाडीत पिस्तूल आढळून आले.
करुणा शर्मा पोलिसांच्या ताब्यात, पिस्तूल प्रकरणी देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रीया… काय म्हणाले…
त्यानंतर, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आणि आज त्यांना आंबेजोगाई कोर्टासमोर आणले गेले. त्यानंतर दोन्ही बाजूच्या वकिलांनी बाजू मांडली. त्यांनतर कोर्टाने करुणा शर्मांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे, तसेच ड्रायव्हरला एक दिवसाची कोठडी सुनावली आहे. दरम्यान, शिक्षा सुनावल्यानंतर शर्मा यांनी जामिनासाठी कोर्टात याचिका दाखल केली असून, त्यावर कोर्टात सुनावणी सुरू आहे. यावेळी त्यांनी, मी तपासात सहकार्य करणार असून असून, मला जामीन द्यावा,” असं सांगितलं आहे.
करुणा शर्मा यांना अडकवण्यासाठी रचले गेले षडयंत्र? नवी माहिती समोर
दुसरीकडे, करुणा शर्मा यांच्या गाडीत पिस्तूल ठेवल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एक पिवळी ओढणी तोंडाला बांधलेली तरुणी, शर्मा यांच्या गाडीच्या डिक्कीत काहीतरी संशयास्पद वस्तू ठेवत असल्याचे या व्हिडीओतून दिसून येत आहे. याप्रकरणी करुणा शर्मा यांनी देखील, “परळीत आल्यानंतर आपल्या गाडीकडे जमाव धावून आला होता,” अशी तक्रार शहर पोलिसात दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी ७०-८० जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.
Read Also :
- बेळगाव महापालिकेत भाजपचा दणदणीत विजय; राज्यातील निवडणुकीत महाविकास आघाडीला फटका बसणार?
- चित्रा वाघ-मेहबूब शेख यांच्यात रंगले सोशल मीडियावर जोरदार शाब्दिक युद्ध
- संजय राऊत तोंडघशी पडले, बेळगांव महानगरपालिकेवर भाजपची मुसंडी, स्पष्ट बहुमत
- शरद पवार यांना तात्काळ अटक करा, अन्यथा आम्ही उच्च न्यायालयात जाऊ – गुणरत्न सदावर्ते
- वसंतदादा पाटीलांचा विश्वासघात करून पवारसाहेब आघाडीतून कसे बाहेर पडले? -भाजप