औरंगाबाद : 35 वर्षे आम्ही काय केले हे कोणाला माहित नाही. कोणी झेंडा लावायला तयार नव्हते, तेव्हा झेंडा लावणारे आम्ही आहोत. मार खाणारे आम्ही, तडीपारी भोघणारे आम्ही, 302 भोगणारे आम्ही, जेलमध्ये जाणारे आम्ही आणि ते 32 वर्षांचा पोरगा उठतो आणि आमच्यावर टिका करतो. तुम्ही गोधडीत नव्हता तेव्हापासून आम्ही शिवसेनेत आहोत, असा टोला गुलाबराव पाटील यांनी आदित्य ठाकरे यांना लगावाला होता. याला औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
“अमित शहा उद्धव ठाकरेंना खोटे म्हणत असतील तर ही चीड आणणारी बाब”
गुलाबराव पाटलांनी खोके मिळायला लागले की तो आदित्य ठाकरेंवर बोलतो. पण मी त्याची गोधडी काढल्याशिवाय राहणार नाही. मला राग आता तर मी काहीही करू शकतो, मी आता गुलाबराव पाटलांचा गळा दाबणार, असं वक्तव्य माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केलं आहे.
“मी मुर्ख आहे का? मी पण डॉक्टर आहे?” हाफकीनच्या मुद्द्यावरून भडकले सावंत
तुम्ही जर उद्धव ठाकरे असाल तर मी सुद्धा राणा आहे, हिंमत असेल तर मैदानात या, असं खासदार नवनीत राणा म्हणाल्या होत्या. त्यानंतर ती बाई आम्हाला काय शिकवणार? ती पिक्चरमध्ये सिगरेट पिते, कसे कसे फोटो काढते, कपडे कशी घालते? अन् ती आम्हाला काय शिकवणार? असा टोला नवनीत राणा यांना चंद्रकांत खैरे यांनी लगावला आहे.
अमित शहा मुंबईत, भाजपचे सर्व नेते उपस्थित, पंकजा मुंडे गायब? राजकीय वर्तुळात चर्चा
उद्धव ठाकरे आणि अमित शहा यांच्यात झालेल्या बैठकीत शिवसेना नेता म्हणून मी हजर होतो. या बैठकीत पहिले अडीच वर्ष मुख्यमंत्री पद एका पक्षाला आणि दुसरे अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद दुसऱ्या पक्षाला मिळणार असे ठरले होते. असे असल्यानंतर जर आता अमित शहा हे उद्धव ठाकरेंना खोटे म्हणत असतील तर ही चीड आणणारी बाब आहे. हे आम्ही सहन करणार नाही. अमित शहा यांच्यासारख्या मोठ्या पदावरील व्यक्तीने असे खोटे बोलणे साफ चुकीचे आहे असं चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं आहे.
Read also
- “वारंवार सांगूनही खात्यावर पैसे यायचे थांबत नसल्याने राजू शेट्टींनी गाठलं थेट तहसिल कार्यालय”
- “स्वत: ला पक्षात उमेदवारी मिळेना अन् बारामती जिंकणार म्हणे”; रूपाली पाटील
- “ज्याच्याबरोबर जास्त आमदार आणि खासदार त्यांंचाच शिवाजी पार्कवर दसरा मेळावा”
- “बारामतीत कुणीही आलं तरी काही फरक पडत नाही”
- “अहमदशाह, आदिलशहा, कुतुबशहा आता अमित शाह, दिल्लीवरून असे किती…;” शिवसेनेने भाजपला डिवचलं