छत्रपती संभाजीनगर : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता राजकीय पक्षातील मतभेद चव्हाट्यावर येण्यास सुरूवात झालं आहे. यातच छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघावरून ठाकरे गटातील दोन्ही नेत्यांमध्ये गटबाजी समोर आली आहे. पक्षांनी आदेश दिला निवडणूक लढविणार अशी इच्छा अंबादास दानवे यांनी व्यक्त करून दाखवली आहे. तर जनता पुन्हा मला मत देणार असं माजी खासदार चंद्रकांत खैरे म्हणताहेत. यातून आता उद्धव ठाकरे यांनी तोडगा काढला असल्याची चर्चा सुरू आहे.
हेही वाचा..“तेव्हा विरोधकांच्या आघाडीचा पंतप्रधानपदाचा चेहरा ठरला नव्हता, तरीही..,”पंतप्रधानपदाबाबत शरद पवारांचं मोठं विधान
छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघावरून अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांच्यात जुंपली आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी दोन्हीही नेते निवडणुक लढविण्यासाठी इच्छूक आहेत. त्यामुळे ठाकरे गटासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. यातच आता उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर छत्रपती संभाजीनगर येथील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत दानवे आणि खैरे यांच्या अनुपस्थित पदाधिकाऱ्यांना उमेदवारीबाबत विचारण्यात आलं. त्यामुळे आता उद्धव ठाकरे नेमकी कुणाला उमेदवारी देणार? यातच चंद्रकांत खैरे यांचा पत्ता कट होणार की अंबादास दानवे यांना उमेदवारी मिळणार? असा सवाल निर्माण झालाय.
हेही वाचा…सदावर्तेंच्या अस्तित्वाला मोठा धक्का, एसटी बॅंकेत महाभूकंप, १२ संचालकांचा तडकाफडकी राजीनामा
दरम्यान, आम्ही एक पक्षाचा शिस्तबद्ध शिवसैनिक राहण्याचा अनेक वर्षापासून प्रयत्न करत असतो, त्यामुळे पक्षप्रमुख जो आदेश देतील, तो मला मान्य आहे. लोकसभा निवडणुकीसाठी माझी इच्छा आहे. परंतु पक्षप्रमुखांनी सांगितलं तर म्हणजे तरच निवडणूक लढवणार. यश मिळालं तर सगळेच गौरव करतात. परंतु अपयश मिळालं तर एकमेकांकडे बोट दाखवलं जातं. याला काही अर्थ नाही. माझ्यात दम आहे. तर निवडून आलं पाहिजे. दम नाही तर हारलो पाहिजे, असे अंबादास दानवेंनी सांगितलं.
दुसऱ्या बाजूला चंद्रकांत खैरे म्हणाले की, अंबादास दानवे गंगापुरमध्ये उभे राहिले होते, त्याठिकाणी त्यांचा पराभव झाला. लोकसभेची मोठी निवडणूक आहे. याठिकाणी १९ लाख मतदार आहेत. उद्धव ठाकरे यांनी मान्य केलं तर होईल. परंतु याठिकाणी मला जनताच म्हणतेय की, पाच वर्षात आपण खुप मागे गेलो आहोत. यावेळीही तुम्हीच खासदार व्हावं, अशी जनतेची इच्छा असल्याचं चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं.
READ ALSO :
हेही वाचा..लोकसभेसाठी वंचितने महाविकास आघाडीकडे मागितल्या ‘इतक्या’ जागा ; दोन आठवड्याची दिली मुदत, नाहीतर..
हेही वाचा…“वॉशिंग मशीनची बी टीम सक्रिय होतेय”, जलीलच्या लोकसभा युतीच्या प्रस्तावावर ठाकरे गटाची खोचक प्रतिक्रिया
हेही वाचा…विजयाची हॅटट्रिक साधण्यासाठी भाजपने ‘या’ नेत्याकडे दिली जबाबदारी ; मोदींसह भाजपच्या नेत्यांचे संपुर्ण देशात होणार दौरे
हेही वाचा…ठाणे हादरलं..! शिंदे गटातील माजी नगरसेवकाच्या घरावर हल्ला, रॉडने गाडीच्या काचा फोडल्या, व्हिडीओ व्हायरल
हेही वाचा..जपानची पदवी महाराष्ट्राला समर्पित..! फडणवीसांना कोयासन विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट प्रदान, पहिले भारतीय