मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूीवर वंचितने ठाकरे सोबत युती केलीय. परंतु महाविकास आघाडीसोबतची युती काही कारणांमुळे अडली आहे. यातच आता २९ डिसेंबर रोजी इंडिया आघाडीची जागावाटपाबाबत बैठक पार पडणार आहे. या बैठकीत इंडिया आघाडीत कुणाला किती जागा ? तसेच इतर गोष्टींवर चर्चा होण्याची शक्यता आहे. त्याआधीच आता वंचितने महाविकास आघाडीसमोर युतीसाठी काही अटी ठेवल्या आहेत.
हेही वाचा…सदावर्तेंच्या अस्तित्वाला मोठा धक्का, एसटी बॅंकेत महाभूकंप, १२ संचालकांचा तडकाफडकी राजीनामा
महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी वंचितसोबतच्या युतीबाबत सकारात्मक प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. परंतु अद्यापही यावर निर्णय झालेला नाही. यातच आता राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादीत फुट पडली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीतील फुटीमुळे या दोन्ही पक्षांची ताकद स्वबळावर लढण्याची राहिलेली नाही. त्यामुळे महाविकास आघाडीने वंचित बहुजन आघाडीबरोबर प्रत्येकी १२ जागा वाटून घेण्याचे सुत्र ठरवावे अशी मागणी वंचितने केली आहे.
हेही वाचा…“राम मंदिर आस्थेचा विषय,या आस्थेला राजकीय वळण देऊ नका”, ठाकरे गटाची भाजपवर जोरदार टिका
दरम्यान, जागा वाटपाबाबत महाविकास आघाडीने दोन आठवड्यात निर्णय घ्यावा. गेल्या काही वर्षात वंचितची ताकद वाढली आहे. बुथरचनाही पुर्ण झालेली आहे.१२ लोकसभेच्या जागांवर कोणती जागा कोण लढवणार यावर नंतर चर्चा होऊ शकते. १२ जागांपैकी ३ जागांवर मुस्लिम उमेदवार उभे करण्याचा वंचितचा मानस आहे. अन्य प्रवर्गातील वंचित घटकांनाही योग्य प्रतिनिधित्व देण्यास तयार आहे. असं वंचितने बोलवलेल्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“वॉशिंग मशीनची बी टीम सक्रिय होतेय”, जलीलच्या लोकसभा युतीच्या प्रस्तावावर ठाकरे गटाची खोचक प्रतिक्रिया
हेही वाचा…विजयाची हॅटट्रिक साधण्यासाठी भाजपने ‘या’ नेत्याकडे दिली जबाबदारी ; मोदींसह भाजपच्या नेत्यांचे संपुर्ण देशात होणार दौरे
हेही वाचा…ठाणे हादरलं..! शिंदे गटातील माजी नगरसेवकाच्या घरावर हल्ला, रॉडने गाडीच्या काचा फोडल्या, व्हिडीओ व्हायरल
हेही वाचा..जपानची पदवी महाराष्ट्राला समर्पित..! फडणवीसांना कोयासन विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट प्रदान, पहिले भारतीय
हेही वाचा..“तेव्हा विरोधकांच्या आघाडीचा पंतप्रधानपदाचा चेहरा ठरला नव्हता, तरीही..,”पंतप्रधानपदाबाबत शरद पवारांचं मोठं विधान