बीड : ओबीसी आरक्षण संपवण्याचा घाट घातला जात असल्याचा गंभीर आरोप मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे. यातच सरसकट मराठ्यांना ओबीसी प्रमाणपत्र देण्यावरही छगन भुजबळ यांनी विरोध केला आहे. आज छगन भुजबळ यांनी बीड येथे जाऊन जाळपोळ झालेल्या घटनांची पाहणी केली. त्यानंतर भुजबळांनी मराठा आरक्षणावरून राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
हेही वाचा…कोल्हापूरकरांनी सतेज पाटील अन् धनंजय महाडिकांना नाकारलं, अपक्ष उमेदवाराने मारली बाजी
सरसकट कुणबी आरक्षण देण्यास आमचा विरोध असणार आहे. कारण ओबीसीमध्ये अनेक जाती असून त्यात मराठ्यांना सामील करून घेतल्यानंतर ओबीसींना मोठं नुकसान होणार आहे. सत्तेत असलेले मंत्री चर्चेसाठी जात आहेत. ते ठिक आहेत. परंतु निवृत्त न्यायमूर्ती सर सर करत जातात. मनोज जरांगे पाटलांसमोर हात जोडत आहेत. त्यांच्याकडून आम्ही न्यायाची काय अपेक्षा करणार ? असा सवाल देखील भुजबळांनी केला आहे.
हेही वाचा…कोल्हापूरकरांनी सतेज पाटील अन् धनंजय महाडिकांना नाकारलं, अपक्ष उमेदवाराने मारली बाजी
दरम्यान, ओबीसी नेत्यांना राज्यात टार्गेट करण्यात आलं आहे. मत देणार नाही म्हणताहेत परंतु ओबीसी समाजाने ठरवलं तर काय होईल हे त्यांना माहिती नाही. आंदोलनाच्या वेळी जमावाकडे हत्यारं होती. मनोज जरांगे पाटलांच्या सभेमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई दिली. आता ज्यांची घरं जाळली त्यांना देखील शासनाने मदत द्यावी, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. सरसकट गुन्हे मागे घेणं योग्य नसल्याचं सांगत जाळपोळ करणारे तुमची माणसं नसती तर त्यांचे गुन्हे मागे का घेत आहेत? असा सवाल देखील भुजबळांनी केलाय.
READ ALSO :
हेही वाचा…“आंदोलनामध्ये कुटुंबीय सापडले असते तर वाचलेच नसते,” छगन भुजबळांचं मोठं विधान
हेही वाचा…छगन भुजबळ यांचा मोठा एल्गार, १७ नोव्हेंबरला ओबीसींचा महामोर्चा, सरकारच्या विरोधात आक्रमक
हेही वाचा…भाजपने तब्बल २०७४ पैकी ६६९ ग्रामपंचायतींवर झेंडा रोवला, मुंबईत मोठा जल्लोष
हेही वाचा…भाजप आमदार नमिता मुंदडा यांना मोठा धक्का..! जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत अजित पवारांच्या ताब्यात
हेही वाचा…नाशकात अजितदादांची दादागिरी, भुजबळांनीही आपला गड राखला