नवी दिल्ली : आज संपुर्ण भारतात 74 वा प्रजासत्ताक दिवस मोठ्या उत्सावात साजरा केला जात आहे. दिल्लीच्या कर्तव्यपथावर भारतातील विविध संस्कृती, एकतेचं दर्शन 22 चित्ररथांमधून घडलं. मात्र यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या बंडाळीने चर्चेत आलेले आसाम मधील कामाख्या देवीचं मंदिर आज देखील यावेळी चर्चेत ठरलं आहे.
मुलायम सिंह यादव, झाकीर हुसेन, सुधा मुर्ती, रविना टंडन यांना पद्म पुरस्कार…! वाचा संपुर्ण यादी
राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांच्यासमोर आसामने नायकांची आणि अध्यात्म भूमी ही थिम घेऊन पथसंचालन केलं. यावेळी त्यांनी सुरूवातीच्या भागात सेनापती लाचित बारफुकन यांची प्रतिकृती तर दुसऱ्या भागात सुप्रसिद्ध कामाख्या देवी मंदिराचा देखावा सादर केला. आसामची संस्कृती असलेल्या बिहू नृत्याचं सादरीकरणही यावेळी त्यांनी केलं आहे.
“फडणवीस साहेब…..! आमच्या पुण्याकडेही लक्ष्य द्या”, सुप्रिया सुळे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या 40 बंडखोर आमदारांना घेऊन थेट आसाम राज्यातील गुवाहाटी गाठलं होतं. यावेळी त्यांनी तेथील प्रसिद्ध कामाख्या देवीचं दर्शन घेऊन ते महाराष्ट्रात आले. मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन त्यांनी पुन्हा एकदा कामाख्या देवीच्या दर्शनाला संपुर्ण आमदारांना घेऊन गुवाहाटी गाठलं. त्यामुळे कामाख्या देवी आणि एकनाथ शिंदे चर्चेचा विषय ठरला आहे.
“सत्यजीत तांबेचा भाजपकडून गेम होणार हे अगोदरच आम्हाला माहिती होतं”
दरम्यान, आज भारतातील 17 राज्याचं प्रतिनिधीत्व करणारे आणि पाच विविध मंत्रालयांच्या चित्ररथांनी पथावरील संचलन केलं. यामध्ये महाराष्ट्राने साडेतीन शक्तीपीठ आणि नारी शक्तीचा देखावा सादर केला. यावेळी देशातील केंद्रीय मंत्र्यांसह मोठ्या प्रमाणात लोकांनी कर्तव्यपथावर हजेरी लावली.
Tableau of Assam with Bihu dance performance #KartavyaPath #RepublicDay2023 pic.twitter.com/EwbSfx7qIM
— DD News (@DDNewslive) January 26, 2023
Read also
- “संविधानाच्या तत्त्वांना सत्ताधारी पक्षांकडून हादरे देण्याचा प्रयत्न,” राष्ट्रवादीचा निशाणा
- “कसबा, चिंचवड पोटनिवडणुका बिनविरोध व्हाव्यात, हे सगळ्यांना उचित राहिल…!” देवेंद्र फडणवीस
- शिंदेंनी बारामतीचा गड फोडला…! बारामती, दौंड, अन् इंदापुरचे कार्यकर्ते शिंदे गटात
- “मुख्यमंत्र्यांनी संतोष बांगरांना अधिकाऱ्यांना मारण्याचा परवाना दिलाय का?” राष्ट्रवादीचा संतप्त सवाल
- ‘‘इंद्रायणी थडी’’मुळे मिळेल २० हजार महिलांच्या हाताला रोजगार! फडणवीसांकडून महोत्सवाचे कौतूक