मुंबई : गणेशोत्सवा दरम्यान ठाकरे गट आणि शिंदे गटात झालेल्या राड्यात हवेत गोळीबार केल्याचा आरोप सदा सरवणकर यांच्यावर करण्यात आला होता. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी पोलिसांकडून सुरू होती. यातच आता या प्रकरणात पोलिसांकडून सदा सरवणकर यांना क्लिन चीट देण्यात आली आहे. त्याच्याविरोधात आज दादर पोलीस स्टेशनवर ठाकरे गटाकडून आंदोलन करण्यात येणार आहे.
हेही वाचा..“शरद पवारांनी आयुष्यभर राजकीय स्वार्थासाठी जातीपातीत भांडण लावली”, भाजपची जहरी टिका
मुंबईतील प्रभादेवीमध्ये गणेशोत्सवादरम्यान ठाकरे आणि शिंदे गटात मोठा राडा झाला होता. या राड्यात आमदार सदा सरवणकर यांनी हवेत गोळीबार केल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला. त्यानंतर त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरू होती. मात्र चौकशी दरम्यान पोलिसांकडे कोणताही पुरावा हाती न लागल्याने सरवणकर यांना क्लिन चीट देण्यात आली आहे.
हेही वाचा..सकाळी मुश्रीफांनी,आता अनिल परबांनी सोमय्यांना अडचणीत पकडलं, थेट हक्कभंगाचा प्रस्ताव
आम्ही गेली ४० वर्ष सोबत होतो, परंतु काही वैचारीक मतभेदामुळे दोन भागात विभागलो गेलो तरी आम्ही अनेकांना नोकऱ्या दिल्या आहेत. त्या लोकांकडून कुणीही तक्रार दाखल करण्यात आलेला नव्हती. फक्त पोलिसांकडून अशा तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्यामुळे गोळीबार करण्याची ज्या दिवशी वेळ येईल. त्या दिवशी राजीनामा देऊ आणि घरी बसू असं सदा सरवणकर यांनी सांगितलं.
Read also
- हेही वाचा..““२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ह्या लफग्यांना जनता रस्त्यावर पळवून पळवून हाणतील”
- हेही वाचा..“शिवसेना ही ठाकरेंचीच, होती, आहे आणि राहणार”, संजय जाधवांचं मोठं विधान, अंधारेंची परभणीत जाहीर सभा
- हेही वाचा..१३ तारखेला राजभवनावर काॅंग्रेसचा ‘विराट मोर्चा’, राज्यातील ‘राजकारण’ तापणार ?
- हेही वाचा…“त्यांना सांगा की, आम्हाला गोळ्या घालून जावा”,हसन मुश्रीफांच्या पत्नीच्या डोळ्यात अश्रू, घरावर सकाळीच इडी धाड
- हेही वाचा…हसन मुश्रीफांच्या घरावर २ महिन्यातून ED ची तिसरी धाड, कार्यकर्ते आक्रमक, पटोलेंची भाजपवर टिका