कोल्हापुर : अप्पासाहेब नलावडे साखर कारखान्यातील गैरव्यवहार प्रकरणी गेल्या दोन महिन्यातील दुसरी धाड ईडीने राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या घरावर टाकली आहे. ईडीचे ४ ते ५ अधिकारी सकाळीच हसन मुश्रीफ यांच्या घरी आल्याने कार्यकर्त्यांनी मुश्रीफांच्या घरासमोर मोठी गर्दी करत सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा बाजी दिली. यावेळी हसन मुश्रीफांच्या पत्नी सायरा मुश्रीफ यांनी अत्यंत संतप्त प्रतिक्रिया समाज माध्यामांना दिली.
हेही वाचा…“खेडच्या विराट सभेतील ‘उद्धव’ दर्शनानंतर भाजपने हिंस्र नखं बाहेर काढली”
एवढं असं करीत आहेत. मग आम्ही काय करायचं? असा सवाल करीत तुम्हीही शांत राहा. त्यांना सांगा की आम्हाला गोळ्या घालून जावा. असं म्हणत त्यांना अश्रू अनावर झालेत. साहेब उपस्थित नसतांना त्यांनी घरात धाड टाकली आहे. साहेबांच्या मिसेस आता रडायला लागल्या आहे. त्यांच्यापेक्षा जनावरं तरी बरे आहे. आमच्या कागलकरांना याची आता ईडीची सवय लावायला लागले आहेत. काल कोर्टाचा काय निकाल झाला अन् तुम्ही इडीची धाड टाकायला आलेत. असा संपप्त सवाल तेथे उपस्थितीत असलेल्या एका महिलेने केला.
हेही वाचा..सोमय्यांना जोर चा झटका, फासे पलटले, मुश्रीफांवरील आरोप भोवले, चौकशीचे दिले आदेश
सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना शेअर्स प्रकरण, आप्पासाहेब नलावडे साखर कारखाना ब्रिक्स कंपनीनं चालवायला घेतला होता. याप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर आरोप केला होता. यासंदर्भात ईडीनं हसन मुश्रीफ यांची चौकशी केली आहे. त्यामुळे आता हसन मुश्रीफ यांच्यावरील दोन महिन्यात तिसऱ्यांदा धाड पडली आहे.
Read also
- हेही वाचा…हसन मुश्रीफांच्या घरावर २ महिन्यातून ED ची तिसरी धाड, कार्यकर्ते आक्रमक, पटोलेंची भाजपवर टिका
- हेही वाचा..“शरद पवारांनी आयुष्यभर राजकीय स्वार्थासाठी जातीपातीत भांडण लावली”, भाजपची जहरी टिका
- हेही वाचा..सकाळी मुश्रीफांनी,आता अनिल परबांनी सोमय्यांना अडचणीत पकडलं, थेट हक्कभंगाचा प्रस्ताव
- हेही वाचा..“कांद्याचे भाव वाढले म्हणून दंगा करणारे लोक आज शेतकऱ्यांकडे ढुंकूनही बघायला तयार नाहीत”
- हेही वाचा…मोठी बातमी…! “राष्ट्रवादीच्या विधान परिषद गटनेतेपदी एकनाथ खडसे यांची नियुक्ती”