कोल्हापुर : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरी आज सकाळीच ईडीने धाड टाकली आहे. अप्पासाहेब नलावडे साखर कारखान्यातील गैरव्यवहार प्रकरणी ही गेल्या २ महिन्यातील तिसरी धाड टाकली आहे. ईडीचे ४ ते ५ अधिकारी सकाळीच हसन मुश्रीफ यांच्या घरी आल्याने कार्यकर्त्यांनी मुश्रीफांच्या घरासमोर मोठी गर्दी करत सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा बाजी दिली.
हेही वाचा..सोमय्यांना जोर चा झटका, फासे पलटले, मुश्रीफांवरील आरोप भोवले, चौकशीचे दिले आदेश
सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना शेअर्स प्रकरण, आप्पासाहेब नलावडे साखर कारखाना ब्रिक्स कंपनीनं चालवायला घेतला होता. याप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर आरोप केला होता. यासंदर्भात ईडीनं हसन मुश्रीफ यांची चौकशी केली आहे. त्यामुळे आता हसन मुश्रीफ यांच्यावरील दोन महिन्यात तिसऱ्यांदा धाड पडली आहे.
हेही वाचा..“शरद पवारांनी महाविकास आघाडीकडून बाहेर पडावं,” रामदास आठवले
दरम्यान, मागील काही महिन्यापासून राज्यातील एव्हाना देशातील विरोधी पक्षातील नेत्यांवर इडीच्या धाडी पडत आहेत. बिहारमध्ये लालू प्रसाद यादव, माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांच्या घरी देखील धाडी पडत आहेत. त्यामुळे सत्ताधारी पक्षाच्या विरोधात विरोधी पक्षांनी आता आंदोलनाचा पवित्रा हाती घेण्याच्या तयारीत आहेत.
हेही वाचा..“बच्चू कडूंची गद्दारी पक्षासोबत होऊ शकते, सर्व सामान्यांशी नाही”
शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव द्यायचं नाही, त्यांना कुठलीच मदत द्यायची नाही. हे सर्व मुद्दे भटकवण्यासाठी भाजप अशा पद्धतीचं काम करीत आहे. हसन मुश्रीफ यांच्यावरील कारवाई देखील त्याच पद्धतीने करण्यात आली आहे. तसेच जे लोक भाजपमध्ये गेले आहेत. त्यांच्यावरील कारवाया भाजपने का थांबवल्या आहेत. असा सवाल काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपला केला आहे.
Read also
- हेही वाचा..“शरद पवारांनी आयुष्यभर राजकीय स्वार्थासाठी जातीपातीत भांडण लावली”, भाजपची जहरी टिका
- हेही वाचा..सकाळी मुश्रीफांनी,आता अनिल परबांनी सोमय्यांना अडचणीत पकडलं, थेट हक्कभंगाचा प्रस्ताव
- हेही वाचा..“कांद्याचे भाव वाढले म्हणून दंगा करणारे लोक आज शेतकऱ्यांकडे ढुंकूनही बघायला तयार नाहीत”
- हेही वाचा…मोठी बातमी…! “राष्ट्रवादीच्या विधान परिषद गटनेतेपदी एकनाथ खडसे यांची नियुक्ती”
- हेही वाचा…“खेडच्या विराट सभेतील ‘उद्धव’ दर्शनानंतर भाजपने हिंस्र नखं बाहेर काढली”