ठाणे : कसब्यातील निकालानंतर महाविकास आघाडी ज्या गतीने पुढे जात आहे. त्याला खिळ घालण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे. त्यामुळे सध्या राज्यात इडीच्या कारवाया केल्या जात आहेत. जे महाविकास आघाडीच्या नेत्यांवर आरोप करीत आहेत. ते सर्व लफंगे आहेत. अन् २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ह्या लफंग्यांना जनता रस्त्यावर पळवून पळवून हाणतील. असा इशारा खासदार संजय राऊत यांनी भाजपला दिला आहे.
हेही वाचा..सकाळी मुश्रीफांनी,आता अनिल परबांनी सोमय्यांना अडचणीत पकडलं, थेट हक्कभंगाचा प्रस्ताव
भाजप नेते किरीट सोमय्या सातत्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांवर भ्रष्ट्राचाराचे आरोप करीत आहेत. यातच आज राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर सकाळी इडीने धाड टाकली. गेल्या २ महिन्यातील ही तिसरी धाड मुश्रीफ यांच्या घरावर इडीने टाकली आहे. त्यामुळे सध्या महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सत्ताधारी प क्षावर जहरी टिका करण्यात येत आहे.
हेही वाचा..“कांद्याचे भाव वाढले म्हणून दंगा करणारे लोक आज शेतकऱ्यांकडे ढुंकूनही बघायला तयार नाहीत”
सदानंद कदम यांना काल अटक केली. त्या अटकेआधी आमचे मुलंडचे पोपटलाल बोलत होते. सदानंद कदम यांना अटक करण्याचं कारण काय? एका तथाकथित प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली आहे. परंतु त्याआधी खेडची सभा यशस्वी करण्यामागे सदानंद कदम यांचा मोठा हात होता. एका कारणामागे त्यांना ईडीच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. त्यांना अटक केल्याची बातमी इडीने देण्याआधी मुलंडच्या पोपटलालने दिली. याचा अर्थ काय? असा सवाल संजय राऊतांनी केला आहे.
हेही वाचा…मोठी बातमी…! “राष्ट्रवादीच्या विधान परिषद गटनेतेपदी एकनाथ खडसे यांची नियुक्ती”
हसन मुश्रीफ यांचा सर्वात आधी एफआयआर त्या माणसांना मिळतो. त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून त्यांना चौकशीचे आदेश दिले आहेत. ह्या महाराष्ट्रात काय चाललंय? आज लालु यादव यांच्या घरावरही इडीच्या धाडी पडल्या आहेत. या अशा माध्यमातून विरोधकांना त्रास देण्याचा प्रयत्न भाजप करीत आहेत. पंरतु त्यांनाही आम्ही जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. असा इशारा राऊतांनी दिला.
Read also
- हेही वाचा..“शिवसेना ही ठाकरेंचीच, होती, आहे आणि राहणार”, संजय जाधवांचं मोठं विधान, अंधारेंची परभणीत जाहीर सभा
- हेही वाचा..१३ तारखेला राजभवनावर काॅंग्रेसचा ‘विराट मोर्चा’, राज्यातील ‘राजकारण’ तापणार ?
- हेही वाचा…“त्यांना सांगा की, आम्हाला गोळ्या घालून जावा”,हसन मुश्रीफांच्या पत्नीच्या डोळ्यात अश्रू, घरावर सकाळीच इडी धाड
- हेही वाचा…हसन मुश्रीफांच्या घरावर २ महिन्यातून ED ची तिसरी धाड, कार्यकर्ते आक्रमक, पटोलेंची भाजपवर टिका
- हेही वाचा..“शरद पवारांनी आयुष्यभर राजकीय स्वार्थासाठी जातीपातीत भांडण लावली”, भाजपची जहरी टिका