सातारा : सातारा नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी विकासकामांच्या उद्घाटनांचा धडाका लावला आहे. अलीकडंच त्यांनी शाहुपुरी आणी करंजासाठी नळपाणी पुरवठा योजनेचं उद्घाटन केलं. त्यावेळी २० वर्षांपूर्वीची आठवण सांगत त्यांनी शिवेंद्रराजे भोसले यांना टोला हाणला होता. त्या टीकेला आमदार शिवेंद्रराजे यांनी उत्तर दिलं आहे. ‘साताऱ्यात सध्या नारळफोड्या गँग फिरत आहे, असा टोला त्यांनी उदयनराजेंना हाणला आहे.
महाविकास आघाडी सरकार पडेल असं वाटत नाही; राज ठाकरेंचा दावा
उदयनराजे व शिवेंद्रराजे हे सध्या एकाच पक्षात असले तरी सातारा जिल्ह्यातील प्रमुख सत्तास्थानांवर वर्चस्व राखण्यासाठी त्यांच्यात नेहमीच चढाओढ असते. जिल्हा बँक निवडणुकीच्या निमित्तानंही त्यांच्यात आरोप-प्रत्यारोप रंगले होते. आता नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर टीका-टिप्पणीचा दुसरा अंक सुरू झाला आहे. कन्हेर धरणातून पाणीपुरवठ्याची योजना रखडण्यासाठी उदयनराजेंनी दिवंगत अभयसिंह राजे भोसले यांना अप्रत्यक्षपणे जबाबदार धरलं होतं. तसंच, विरोधकांना चिमटाही काढला होता. उदयनराजेंच्या या आरोपांना व टीकेला शिवेंद्र राजेंनी उत्तर दिलं आहे.
‘दिलीप सोपल हे राज्याचे पाणी पुरवठा मंत्री असताना ही योजना मंजूर झाली होती. त्यानंतर सुद्धा ही योजना रखडली. मात्र अजित पवार यांच्याकडून अतिरिक्त निधी घेऊन योजना मार्गी लावण्याचं काम मी केलं आहे. त्यामुळं उदयनराजेंनी कितीही म्हटलं की योजना आम्ही आणल्या तरी सत्य लपत नाही. मुळात शाहुपुरी ग्रामपंचायतीवर एवढी वर्षे उदयनराजे यांचीच सत्ता असताना ही योजना का पूर्ण झाली नाही, असा सवाल शिवेंद्रराजेंनी केला आहे.
९६ मतं फुटली आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विनोदवीर ठरले; आशिष शेलारांनी नाना पटोलेंची उडवली खिल्ली
‘हद्दवाढीचा निर्णय सुद्धा या आधीच झाला असता, पण उदयनराजेंनी राजकारण करत त्यांच्या बगलबच्यांना संभाळण्यासाठी हा निर्णय होऊ दिला नाही. आता निवडणुका जवळ येतील तसे यांचे नारळ फोडायचे कार्यक्रम आणखी वाढतील, असा चिमटाही त्यांनी काढला. त्यामुळं उदयनराजे आणि शिवेंद्रराजे असा शाब्दिक सामना सातारकरांना पुन्हा पाहायला मिळणार हे स्पष्ट झालं आहे.
Read Also :
- “त्यांच्या बापाशी लढून मी त्या पक्षामधून बाहेर पडलो. हे त्यांनी विसरू नये”
- भाजपच्या 12 आमदारांना सुप्रीम कोर्टाचा झटका, अधिवेशनालाही हजर राहता येणार नाही
- विलास लांडे पुणे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागेवर आमदार होणार.!
- मी स्वत: निवडून आलो त्यापेक्षा जास्त आनंद बावनकुळेंच्या विजयाने; देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया
- शिवसेना सचिव नार्वेकरांचा अवैधरित्या बांधलेला बंगला जमीनदोस्त; किरीट सोमय्यांच्या पाठपुराव्याला अखेर यश