नवी दिल्ली : देशात कोरोनारुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. लसीकरण मोहीम सुरू असली तरी त्याचा वेग मंदावला आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यात लसींचा तुटवडा जाणवत आहे. यावरून आता काँग्रेसने पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. दिल्ली पोलिसांनी ‘मोदीजी, आमच्या मुलांची लस परदेशात का पाठवली ?’, असे पोस्टर लावणाऱ्या अनेकांना अटक केली होती. यावर आता आम आदमी पक्षासह, काँग्रेस नेत्यांनी देखील या पोस्टरचा फोटो शेअर करत मोदी सरकारला सवाल केला आहे.
लसीकरणाच्या सुरुवातीच्या टप्प्यात भारताने अनेक देशांनी लस पुरवठा केला होता. मात्र, आता देशातच लसींसह, अनेक अत्यावश्यक वस्तू इतर देशांतून आयात कराव्या लागत आहेत, यावरून काँग्रेस नेत्यांनी टीका केली आहे.
एक सवाल ने तानाशाह के खेमे में बवाल मचा दिया है।
— Congress (@INCIndia) May 16, 2021
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंसह अनेक काँग्रेस नेत्यांनी आपल्या ट्विटर अकाउंटचे प्रोफाइल पिक्चर बदलत मोदी सरकारला सवाल केला आहे. काळ्या रंगातील या प्रोफाइल पिक्चरमध्ये मोदीजी, आमच्या मुलांची लस परदेशात का पाठवली ? असा सवाल काँग्रेसने विचारला आहे.
Arrest me too.
मुझे भी गिरफ़्तार करो। pic.twitter.com/eZWp2NYysZ
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 16, 2021
#NewProfilePic pic.twitter.com/5rpThsL8H4
— Nana Patole (@NANA_PATOLE) May 16, 2021
प्रधानमंत्री मोदीजी कब तक मौन रहोगे? जवाब दो; हमारे बच्चों की वैक्सीन विदेश क्यों भेज दिया? pic.twitter.com/wjiFV37TKO
— Mukul Wasnik (@MukulWasnik) May 16, 2021
The entire nation asks this question to you.
Arrest us all if you must. pic.twitter.com/XwZdUuGvIp
— K C Venugopal (@kcvenugopalmp) May 16, 2021
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी ‘मला सुद्धा अटक करा’, असे लिहित हा फोटो शेअर केला आहे. अनेक काँग्रेस नेत्यांनी प्रोफाइल पिक्चर बदलत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
Read Also :
- ‘शेतकऱ्यांना लुटणाऱ्या सैतानानो नरकात सुद्धा जागा मिळणार नाही’
- ‘अजित पवारांनी ‘कोव्हॅक्सिन’चा प्रकल्प विदर्भातून पुण्याला पळवला’
- … म्हणून पुण्यात आज लसीकरण पूर्णपणे बंद राहणार
- तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अमित शाहांनी घेतला तयारीचा आढावा
- केंद्राकडून खतांच्या किंमतीत वाढ, राष्ट्रवादी काँग्रेस राज्यभर करणार आंदोलन