पुणे : पुण्यात भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत फायरिंग झाल्याची माहिती मिळत आहे. काँग्रेस कार्यकर्त्याचा भर दिवसा गोळ्या घालून खून झाल्याची माहिती मिळत आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी भारती विद्यापीठ पोलिस दाखल झाले आहेत. परिसरात सध्या तणाव निर्माण झाला आहे.
एसटी संपकऱ्यांवर नव संकट: यवतमाळमधील ५१ एसटी कर्मचाऱ्यांची बदली, तर ३०१ जणांचे निलंबन
समीर मुनीर मृत्यू झालेल्याचे नाव असून काँग्रेस कार्यकर्ता असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या परिसरात वाहतूक कोंडी झाली असून पोलिसांकडून वाहतूक कोंडी फोडण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. या घटनेत सहा गोळ्या फायर केल्या असून एकाचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.
घटनास्थळी भारती विद्यापीठ पोलिस दाखल झाले असून मृतदेह ताब्यात घेतला आहे. मृतदेह पुढील तपासणीसाठी पाठविण्यात आला असून परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली असून पोलिसांकडून वाहतूक कोंडी प्रयत्न चालू आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समीर हा चहा पिण्यासाठी चंद्रभागा चौकात आला असता तिघांनी दुचाकीवरून येत सहा गोळ्या फायर केल्या. या फायरींगमध्ये समीरचा जागीच मृत्यू झाला आहे.
एक बाई स्वातंत्र्याला भीक म्हणते आणि त्यावरती एकही साहित्यिक बोलत नाहीत – बाळासाहेब थोरात
काँग्रेस पक्षाच्या बारामती लोकसभा मतदार संघाचे अल्पसंख्यांक अध्यक्ष म्हणून त्यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली होती. त्याचबरोबर आंबेगाव परिसरातील दत्तनगरमध्ये पुरंदर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस आमदार संजय जगताप यांच्या हस्ते जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले होते.
Read Also :
- भाजप नगरसेवकांची सहल, हा आचारसंहिता भंग नाही का?; काँग्रेसचा आक्षेप
- शिवेंद्रसिंहराजेंचा पत्ता कट; सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची माळ नितिन पाटलांच्या गळ्यात
- ओमायक्रॉनची चिंता वाढली: राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागणार? अजित पवार म्हणतात…
- देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्ध फौजदारी आरोप निश्चित; प्रतिज्ञापत्रात गुन्ह्यांची माहिती लपवल्याचे प्रकरण
- वीर सावरकरांबद्दल जो वाद झाला तो दुर्दैवी, त्यांना मराठी माणूस विसरू शकत नाही – शरद पवार